चिपळूण : कोकणात शिमगा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. शिमगोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव हे देखील दरवर्षीप्रमाणे आज त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी दाखल झाले आहेत.
तर ग्रामदेवता श्री शारदादेवीची पालखी खांद्यावर घेऊन देहभान विसरून ते नाचवताना दिसले. आमदार भास्करराव जाधव हेदेखील दरवर्षीप्रमाणे आज त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी देहभान विसरून ग्रामदेवता श्री शारदादेवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचवताना दिसले. आपल्या ग्रामदेवतेवर प्रचंड श्रद्धा असलेले आमदार जाधव हे काहीही झाले आणि कुठेही असले तरी नवरात्र उत्सवात शारदेच्या दरबारात पारंपरिक जाखडी नृत्य करण्यासाठी आणि शिमगोत्सवात पालखी नाचविण्यासाठी पोहोचतात. गावच्या सहाणेसमोर होम पेटवण्यात आल्यानंतर ग्रामस्थांसह ढोल-सनईच्या ठेक्यावर पालखी नाचविताना ते तल्लीन होऊन गेले होते. यावेळी त्यांचे बंधू, मुले, पुतणे हेदेखील सहभागी झाले होते.