१२ ते १५ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ‘कॉर्बेव्हॅक्स’ लसीचे ३० कोटी डोस उपलब्ध

१२ ते १५ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ‘कॉर्बेव्हॅक्स’ लसीचे ३० कोटी डोस उपलब्ध

मुंबई : राष्ट्रीय लसीकरण दिनाच्या औचित्याने आणि आपल्या देशाला कोव्हीड-१९ पासून सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी बायोलॉजिकल ई. लिमिटेडने आपल्या ‘कॉर्बेव्हॅक्स’ (CORBEVAX TM) या लसीच्या माध्यमातून भारतीय लोकसंख्येच्या १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा पहिला टप्पा पार पाडण्यासाठी सर्व सिद्धता केली आहे. भारत सरकारला दिलेल्या वचनानुसार आजपर्यंत ३० कोटी लसींची निर्मिती करण्यात आली आहे.

बायोलॉजिकल ई. लिमिटेडने कॉर्बेव्हॅक्स या आपल्या लसीच्या माध्यमातून लस विकसित करण्यासाठी टेक्सस चिल्ड्रन्स हॉस्पिटल आणि बेलर कॉलेज यांच्याशी सहयोग साधला आहे. यूएसएतील डायनाव्हॅक्स इंकने आवश्यक साधनसामग्री पुरवून कॉर्बेव्हॅक्स या आपल्या लसीच्या माध्यमातून निर्मितीला पाठबळ दिले आहे व टीएचएसटीआय दिल्ली या संस्थेने एका सर्वंकष क्लिनिकल चाचणी विकास योजनेचा एक भाग म्हणून प्रमुख इम्युनोजेनिसिटी टेस्टिंग पार पडले आहे.

बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या बायोटेक्नोलॉजी विभागाची एक शाखा असलेले BIRAC आणि कोअलिशन फर एपिडेमिक प्रिव्हेन्शन अँड इनोव्हेशन (सीईपीआय) यांनी लसीच्या क्लिनिकल विकासाच्या टप्प्यावर आंशिक निधीपुरवठा केला आहे. कॉर्बेव्हॅक्स हे नोवेल कोरोनाविषाणूच्या विरोधातील एक रिकॉम्पिन्टन्ट प्रोटीन सबयुनिट वॅक्सीन आहे व १२-१८ वर्षे वयोगटीतील मुले आणि १८-८० वर्षे वयोगटातील प्रौढ व्यक्तींना ही लस देण्याची  आपत्कालीन संमती देण्यात आली आहे. कॉर्बेव्हॅक्स ही लस स्नायूंवाटे दिली जाते व त्याचे दोन डोस २८ दिवसांच्या अंतराने घ्यावे लागतात. या लसी २ ते ८ डिग्री सेल्सियस तापमानामध्ये साठवून ठेवल्या जातात.

लसींचा पुरवठा तत्परतेने आणि वेगाने व्हावा तसेच हे करताना सुरक्षेचा सर्वोच्च दर्जा सांभाळला जावा यासाठी बायोलॉजिकल ई. लिमिटेड आपल्या उत्पादन आणि पुरवठा साखळी सुविधा अधिक बळकट करत आहे हे सांगण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. देशातील काही सर्वात मोठ्या आणि विश्वासार्ह फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक कंपनी या नात्याने देशाच्या कोव्हिड-१९ विरोधात चाललेल्या लढाईत सक्रियपणे सहभागी होणे व भारताला सुरक्षित बनविणे हे आमचे कर्तव्य व जबाबदारी आहे असे आम्हाला वाटते. लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात याची खातरजमा करण्यासाठी बायोलॉजिकल ई. लिमिटेडने दर महिन्याला १० कोटींहून अधिक डोस तयार करण्याची क्षमता प्राप्त केली आहे तशीच वेळ आल्यास वाढत्या गरजेला प्रतिसाद देण्यासही आम्ही तयार आहोत.

या लसीद्वारे निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती SARS-CoV-2 चा मूळ स्ट्रेन तसेच बीटा, डेल्टा व ओमिक्रॉनसारख्या इतर प्रकारांना सारख्याच प्रकारे निष्प्रभ करत असल्याचे कॉर्बेव्हॅक्स च्या क्लिनिकल चाचण्यांदरम्यान असे दिसून आले आहे.

बायोलॉजिकल ई. लिमिटेड विविध समाजगटांना व एकूणच समाजाला परवडणा-या दरांत आरोग्यसेवा पुरविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. पात्र नागरिकांना मोफत लसपुरवठा करणा-या भारत सरकारसाठी कॉर्बेव्हॅक्स ही सर्वात वाजवी किंमतीमध्ये उपलब्ध कोव्हिड-१९ लस आहे याचा आम्हाला अभिमान आहे. खासगी बाजारपेठेत कॉर्बेव्हॅक्सची किंमत सर्व कर आणि लस देण्याचे शुल्क यांच्यासह ९९० रुपये इतकी आहे.

कॉर्बेव्हॅक्स लसीची ठळक वैशिष्ट्ये:

  • भारतीय लोकसंख्येतील १२ ते ८० वर्षे वयोगटाच्य लसीकरणासाठी ईयूए मिळविणारी देशी बनावटीची पहिली भारतीय लस
  • कॉर्बेव्हॅक्स ही नोव्हेल कोरोनाव्हायरसविरोधातील रिकॉम्बॅनन्ट प्रोटीन सबयुनिट लस आहे.
  • न्यूट्रलायझिंग अँटिबॉडी टायटर्स पातळीच्या आधारे केलेल्या निरीक्षणानुसार कॉर्बेव्हॅक्स मुळे निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती विषाणूच्या मूळ स्ट्रेनविरोधात ९० टक्क्यांहून अधिक परिणामकारक असल्याचे तर डेल्टा स्ट्रेनच्या प्रकरणांमध्ये >८० टक्के परिणामकारक असल्याचे दिसून आले.
  • कॉर्बेव्हॅक्स लस ही लसीकरानंतर सहा महिन्यांहून अधिक काळ अत्यंत चांगल्या प्रकारे अँटिबॉडी प्रतिसाद निर्माण करते.
  • बायोलॉजिकल ई. लिमिटेड’ची प्रतिवर्षी १०० कोटी कॉर्बेव्हॅक्स लसी निर्माण करण्याची क्षमता आहे.
  • कॉर्बेव्हॅक्स ही कोव्हिड-१९ साठीची भारतातील तसेच जगभरातील सर्वात परवडण्याजोगी लस आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *