शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक …
——————————————-संभाजी कांबळे

/ गुडाळ वार्ताहर

विश्वासावर चालणारी माझ्यामते जगातील एकमेव बँक. गोरगरीब शेतकऱ्यांची बँक. शेतकऱ्यांच्या गरजा भागवणारी ही कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक प्रत्येकाच्या घरचा एक सदस्य आहे. सेवा सोसायट्या, सलग्न असणाऱ्या या बँकेने कित्येक लग्नासाठी मदत केली ,कित्येक घर बांधण्यासाठी मदत केली, मोटरसायकल ,शेतीपूरक वाहने घेण्यासाठी ह्या बँकेने मोलाचा हात दिलाय.
बाकीच्या बँका वाईट आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाही .पण त्यांनी मात्र या बँकेचे चांगुलपणाचे गुण घ्यावेत हे मात्र अधोरेखित करावे असे वाटते.
शेतकरी, गोरगरीब, अशिक्षित लोकांना सन्मानाची वागणूक देऊन विचारपूस करणारे कर्मचारी वर्ग फक्त जिल्हा बँकेतच मिळणार बाकीच्या बँकांचा अपवाद वगळल्यास प्रत्येक खातेदाराला नावाने ओळखणारी ही बँक आहे .प्रत्येकाशी आपुलकीचा संबंध असणारे जिल्हा बँकेचे कर्मचारी आहेत.
या बँकेचा लोकांच्यावर एवढा विश्वास आहे की चेक उद्या देतो आणि पैसे आज पाहिजे म्हटलं तरीही बँक देणार. चेक लिहिण्यात किंवा स्लिप लिहिण्यात चूक झाली तरी समजून घेणार .प्रत्येकाशी बोलण्याची सभ्यता अतिशय चांगली.
स्त्रिया , वृद्ध माणसे, अशिक्षित माणसं या बँकेत जाऊन स्वतः व्यवहार करतात पण बाकीच्या बँकांमध्ये जाण्याचे धाडस ही लोकं सहजासहजी करत नाहीत. कारण तिथे त्यांना आपुलकीची वागणूक मिळत नाही यांना समजून घेणारा कर्मचारी दुर्मिळच.
बाकीच्या बँकांमध्ये स्वतःचे पैसे काढण्यासाठी पासबुक का बरोबर भीती आणि शंका घेऊन जावं लागतं कारण कॅशियरच्या चेहऱ्याकडे पाहूनच वाटतंय पैसे मिळतात का नाही .काय माहित? त्याचे चार वेळा चेक उलटसुलट करून बघतात माणसांकडे बघून परत चेककडे बघायचं. कधी कधी सहीत फरक वाटतोय म्हणून मॅनेजरकडे पाठवायचं .आहो अशिक्षित माणसे बँकेत आल्यावर घाबरतात साहजिकच त्यांचे हात थरथरत असणार. पण श्रीमंत माणस स्वतःच्या बापाची बँक असल्यासारखं बँकेत येतात .त्यांना मान -सन्मान भरपूर .त्यांना सामान्य बाकड्यावर बसाव वाटत नाही. मॅनेजर साहेबांची केबिन त्यांना रिझर्व असते. पण साहेब इतिहास साक्षीदार आहे .बॅंकांना लुटणारे तुमच्या नजरेतील सभ्य, सन्मानीय, ओळीत उभे न राहणारे कॅशियरने चेककडे कानाडोळा केलेले श्रीमंतच आहेत.
अश्या बँकेचे शिपाई सुद्धा साहेबाचा आव आणतात बाकीच्या बँकांनी राग मानु नये पण वास्तव सांगायलाच पाहिजे.
गोरगरीब, अशिक्षित, शेतकरी .कधीच फसवणारा नसतो ,तो प्रामाणिक असतो .त्याला स्वतःचे पैसे हवे असतात .आणि तुमच्याकडून त्याला चांगली वागणूक.
जो कधीच फसवणार नाही त्याला 100 नियम. जो तुम्हाला फसणारच आहे त्याला नियम नाही. हे मात्र प्रत्येकाला खटकणार आहे.
सर्वसामान्यांचे ऋणानुबंध जोडलेल्या, जुळवून आणणार्‍या ,आपुलकीचे नाते जपणार्‍या , कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शतशः आभार….

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *