ठाणे: कोकणसारख्या अवघड मार्गाने रेल्वे गाडी चालवून प्रवाशांना सुखरूप गावी सोडणार्या लोकोपायलट यांच्यासोबत धुळवड साजरी करण्यात आली. *निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने *लोको पायलट तानाजी भाळआणि त्यांचे सहाय्यक लोकोपायलट यांच्यासोबत धुळवड साजरी केली. तसेच या लोकोपायलटना प्रसाद म्हणून खाऊ देण्यात आला. हे आदरातिथ्य पाहून रेल्वे कर्मचार्यांना गहिवरून आले.
शिमगोत्सव म्हटला की, कोकणातील चाकरमान्यांचा जीव की प्राण. शिमगा आला की मुंबईत राहणारे हजारो चाकरमानी आपल्या गावाकडे शिमगोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. या सर्व चाकरमान्यांना सुखरूप त्यांच्या गंतव्यस्थानी सोडण्यासाठी आपली कोकण रेल्वे सतत तत्पर असते. प्रवासात विघ्न येऊ नये म्हणून ही कोकण रेल्वे चालविणारे लोकोपायलट आणि त्यांचे सहाय्यक लोकोपायलट प्रचंड मेहनत घेत असतात. आपल्या प्रवाशांना व्यवस्थित घरी सोडणार्या या लोकोपायलट व त्यांचे सहाय्यक उपकाराची जाण ठेवून पत्रकार संदेश जिमन* आणि त्यांच्या सहकार्यांनी ठाणे रेल्वेस्थानकात जाऊन* मांडवी एक्स्प्रेस चालविणार्या तानाजी भाल आणि सहाय्यक लोकोपायलट यांच्यासोबत धुळवट साजरी केली. यावेळी या धुळवडीचा बच्चे कंपनीनेसुद्धा आनंद लुटला. तुषार मालप, श्रीनाथ आडकर प्रशांत जामसुतकर, संदेश मालप, सिद्धेश होडे, विघ्नेश जामसुतकर, सारशी जामसुतकर, मृणाली महाडिक या लहानग्यांनी मुख्य लोकोपायलट डिसिल्व्हा यांना रंग लावून धुळवड साजरी केली.
Posted inमहाराष्ट्र
मांडवी एक्स्प्रेसच्या चालकांना दिला धुळवडीचा आंनद
