ट्रक कोसळला दरीत तर इर्टिकातील 3 प्रवासी जखमी
संगमेश्वर : मुंबई- गोवा महामार्गावरील तळेकांटे येथे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ट्रक व इर्टिकाचा मोठा अपघात झाला. या अपघातात इर्टिकामधील 3 प्रवासी जखमी झाले आहेत.
रत्नागिरीहुन तळेकांटेच्या दिशेने जाणाऱ्या इर्टिका कारला गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रक खोल दरीत कोसळला. तर इर्टिकातील प्रवासी जखमी झाले. इर्टिका गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस रात्री घटनास्थळी दाखल झाले. दरीत कोसळलेल्या ट्रकची पाहणी केली असता. ट्रक चालक दिसून आला नाही. ट्रक चालक फरार झाला आहे. तर जखमींना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीमध्ये 2 स्त्रिया, 1 पुरुषाचा समावेश आहे असे समजते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिकची माहिती समजू शकलेली नाही.