तिथीची खाज कशासाठी ?
केवळ शिवाजी हे नुसते नाव जरी उच्चारले तरी हिंदूच्या तेहतीस कोटी देवांची फलटन बाद होते, अस प्रबोधकार ठाकरे म्हणत त्या विश्ववंद्य छ. शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव तिथीच्या फे-यात आडकवण्यासाठी शिवद्रोही बाबा पुरंदरे व त्यांची पिलावळ तडफडून स्वर्गवाशी झाली. पण त्यात त्यांना पुर्णपणे यश आलेले नाही व ते येणारही नाही, कारण मराठा सेवा संघ व बामसेफ या सामाजिक संघटना जोपर्यत इथे आहेत तोपर्यत ते कदापीही शक्य होणार नाही. हे निर्विवाद सत्य असताना जे बाबा पुरंदरेचे निकटवर्तीय जेम्स लेन व त्यांच्या पिलावळींनी छ. शिवाजी महाराजांची बदनामी केली त्यावेळी सावधान म्हटल्यास धुम ठोकणा-या रामदासाच्या लंगोटीत स्वतःला लपवून घेणारे हेच ते मनसेप्रमुख मात्र आज मोठ्या प्रमाणात तारखेनूसार शिवजयंती उत्सव पाहुन चवतालेले दिसतात म्हणून तर ते तिथीनूसार जयंती करा अस म्हणून डांगोंरा पिटताना दिसतात पण त्यांच छ. शिवाजी महाजावर केवळ बेगडी प्रेम हे शिवभक्तांनी अनुभवल आहे. म्हणून तर म्हणून तर विद्रोही कवी विश्वांभर वराट म्हणतात की,
‘शिवजयंती जवळ येताच
सुरू होतो तिथीचा वाद
गुदुगूदु करू लागतं
बाटग्यांचं मुळव्याध’
महात्मा फुलेंनी रायगडावर जाऊन झाडाझुडपात असलेली छ. शिवाजी महाराजांची समाधी शोधली त्यावेळी महात्मा फुलेंनी त्या समाधीवर वाहीलेली फुले भटाने पायाने उडवून दिली होती. नंतर महात्मा फुलेंनी शिवजयंती साजरी केली तेव्हा शिवजयंती मोठ्या प्रमातात साजरी होतेय हे पाहून भटमान्य टिळकांचा मुळव्याध जागा झाला त्या जागलेल्या मुळव्याला फुटलेला कोंब म्हणजे त्यांनी केलेला तो दहा दिवसांचा उत्सव ?तसेच आज शिवजयंती १९ फ्रेबुवारी रोजी देशभरात एकाच दिवशी एकाचवेळी मोठ्या उत्साहात साजरी होतेय हे पाहुन ठाकरेंच्या कंबरेखाली जळजळ तर होत नसेल ?कारण फुलेंनी केलेली शिवजन्मोत्साची सुरूवात आणि काल मोठ्या प्रमाणात साजरी झालेली जयंती हेच टिळक व टिळकी विचारधारेंच्या ठाकरेंचे खरे दुखणे आहे हा कोणताही माणूस सहज ओळखतो पण यावर एकच रामबाण उपाय म्हणजे शिवजयंती तारखेनुसारच साजरी होणार अन् राज ठाकरेंच्या बुडाला आग लागणार ?.
महाराष्ट्र शासनाकडून आज तारखेनुसार अर्थात १९ फेब्रुवारीला साजरी केली जाणारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत एका कार्यक्रमामध्ये बोलताना म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनेच साजरी करा. शिवाजी महाराजांचा जन्म दिवस हा आपल्यासाठी एक उत्सवच आहे, एक सणच आहे. वाढदिवस वगैरे या गोष्टी सामान्य माणसांसाठी असतात. महापुरुषांची जयंती असते. गणेशोत्सव असो की दिवाळी आपण तिथीने साजरी करतो. त्यामुळे शिवाजी महाराजांची जयंतीही तिथीनेच साजरी झाली पाहिजे. यंदा तिथीनुसार अर्थात फाल्गुन वद्य तृतीया ही तिथीनुसारची शिवजयंती २१ मार्च २०२२ दिवशी आहे अस ते म्हणाले.(टीव्ही९मराठी १९ फेब्रु. २२) त्या राज ठाकरेंना सागावं वाटत की, तुमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे म्हटल्याप्रमाणे केवळ शिवाजी हे नुसते नाव जरी उच्चारले तर तुमच्या काल्पनीक देवांची फलटन जर बाद होत असेल तर ते विश्ववंद्य छ. शिवराय हे थोताड पांचांग व तिथीच्या गोंधळात अडकले जातील का ?जर राज ठाकारेंना तिथीचा एवढाच पुळका असेल तर त्यांनी त्यांच्या मुलाचा व पत्नीचा आणि स्वतःचा वाढदिवस खुशाल तिथीनूसारसाजरा करावा. कारण आज तिथीनूसार कोणतेही शासकीय कार्यालय, शाळा व महाविद्यालयांचा कार्यभार सुरू होत नसून गावाच्या ग्रामपंचायचा कार्यभार देखिल तिथीनूसार चालत नाही तर मग १९ फ्रेबुवारी ही तारखेनूसार होणारी शिवजयंती तिथीनूसार साजरी करण्यासाठी राज ठाकरे का धडपडत आहेत ?राज ठाकरेंनी त्यांचे चुलते स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व स्मृतीदिन खुशाल तिथीनूसार साजरा करून दररोज त्यांच्या नावाने काकड आरत्या माकड आरत्या म्हणत टाळ कुटावेत त्यांच्याशी आमच्या बहुजन समाजाचा काहीएक संबंध नाही कारण बाळासाहेब ठाकरे हे काही महाषुरूष नाहीत ते बळजबरीने महापुरुषाच्या यादीत ढकलेले संकरीत वाण ?आहे अस म्हटल तरी स्वतःच मस्तक स्वतःच्या धडावर असलेला कोणताही शहाणा माणुस हे नकारू शकणार नाही. कारण महाविकास आघाडी सरकारने जी महापुरुषाची यादी जाहीर केली त्यात बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घुसडले पण सुधीर ढवळे लिखित ‘भांडवलाचा सरंजामी देव बाळ ठाकरे’ या पुस्तकात याच बनावट महापुरुषाचा समाचार लेखकाने घेतला आहे हे पुस्तक वाचकांनी आवश्य वाचल पाहीजे. कारण एका रात्रीत टोलच अंदोलन मागे घेणा-या राज ठाकरेंच बोलण शिवभक्त कदापीही मनावर घेणार नाहीत.
ज्या छ. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन भाजप सरकारने मताचा जोगवा मागून सत्तेचा उपभोग घेत आहेत त्यांनी १२ जानेवारी रोजी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ नावाचे पुस्तक प्रकाशित करून छ. शिवाजी महाराजांची बरोबरी केली तसेच अभिनेत्री पायल रहोतगी हीने शिवरायांविषयी बोलताना गरळ ओकली तेव्हा तोंडातून भ्र सुध्दा न काढणारे राज ठाकरे शिवजयंतीच्या तिथी तारखेचा संभ्रम निर्माण करून स्वतःच काय नवनिर्माण ?करू पाहत आहेत. शिवरायांच्या स्वराज्याची राजमुद्रा राज ठाकरे स्वतःच्या फायद्यासाठी वापरत आहेत त्या राज ठाकरेंच्या तोंडी छ. शिवरायांच नाव सुध्दा शोभा देते ?म्हणून तर इथे विद्रोही शायर प्रशांत बोयबार म्हणतात की,
शराब के नशें में चूर है दुनिया मदहोश हैं,
बस कुछ पल का ही शराबी हिजडों का ये जोश है,
बुरा तो इस बात का हैं शिवबा
उन गंदी जुबानो पें तुम्हारे ही नाम का जयघोष है !’
महाराष्ट्रभर तलवार वाटपाचा कार्यक्रम घेऊ म्हणणा-या राज ठाकरेंनी छ. शिवाजी महाराज व त्यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी कोणते तीर मारलेत ?म्हणून तर विद्रोही कवी विश्वाभर वराट म्हणतात की,
‘राज ठाकरे तलवारीच वाटतील
न वाटतील ज्ञानाचे पुस्तक
कारण भटशाहीच्या पायावर
राज ठाकरेंचं सडकं मस्तक !’
कधी शाळा काँलेज किंवा एखाद्या त्यांच्या तिथीनूसार साज-या होणा-या शिवजयंतीच्या कार्यक्रात शिवचरित्राच वाटप केल आहे का ?तलवार वाटपाचे कार्यक्रम घेणा-या ठाकरेंना सागावं वाटत की, बहूजन चळवळीत घडलेला सामान्य घरातील सामान्य कार्यकर्ता काँ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकासह अनेक छोट्या मोठ्या शिवचरित्राच्या शेकडो प्रती वाटप करतो कारण त्याला वाटते की, माझ्या बहूजन समाजातील तरुणांना छ. शिवाजी महाराज व त्यांचे विचार समजले पाहीजेत हा त्या कार्यकर्त्याचा मुख्य उद्देश असतो पण तलवार वाटण्याची भाषा करणा-या राज ठाकरेंना पुस्तक वाटपाचे महत्व काय घंटा समाजार ?म्हणूनच ‘लढा मनुवाद्यांशी’ या पुस्तकात प्रा. मा.म. देशमुख म्हणतात की,
‘जैसे थे’ स्थिती कायम रहावी म्हणून आपली विद्वत्ता खर्ची घालणारे हे विद्वान परिवर्तनवादी चळवळीतील लहानात लहान कार्यकर्त्यांच्या तळपायाच्या धुळीचीही बरोबरी करू शकत नाहीत. हे प्रतिगामी शेणकिडे परिवर्तनवादी सूर्यकिरणांचा प्रकाश कुठून आणणार ?वर्णव्यवस्थेच्या उकीरड्यावर चरणे हाच त्यांचा धर्म !
माँसाहेब जिजाऊ व छ. शिवाजी महाराज यांची लेनच्या माध्यमातून पुण्यातील मनुवाद्यांनी बदनामी केली तसेच चित्रपटातून तसेच पाठ्यपुस्तकातून वारंवार शिवाजी महाराजांची बदनामी होताना दिसतेय त्यावेळी राज व त्यांचे ठाकरे कुटुंबीय काय तोंडात ‘शिव’वडा घालून घेतात का ?म्हणून तर डाँ. बालाजी जाधव हे त्यांच्या ‘राज ठाकरे, महाराष्ट्र तुमच्या बापाचा नाही’ या पुस्तकात म्हणतात की, दै. सामना मध्ये ०७ सप्टें २००३ ला अनंत देशपांडे याने लेनच्या पुस्तकाचे गोडवे गायले. त्याला कोणत्याही ठाकरेंनी विरोध केला नाही. बरं तेव्हा राज ठाकरे हे काय बाळंत घाण करण्याएवढे लहानही नव्हते. तर चांगले ओठावरच्या मिश्या कापून सफाचट करण्याऐवढे तरणेताठे होते.
बाबा पुरंदरे म्हणजे शिवचरित्राला ढसलेला विषारी सर्प होता त्याने शिवाजी महाराजांच्या पितृत्वावर शंका घेतली त्या सर्पाला श्रध्दांजली वाहताना तिथीचे समर्थक राज ठाकरे म्हणतात की, बाबासाहेब पुरंदरे हे शिवाजी महाराजांचे खरे संरक्षक होते तसेच पुरंदरे सदैव आपल्या वडीलांसारखे राहतील. (रिपब्लिक वर्ल्ड १५ नोव्हे २०२१) राज ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया पाहुन हसू येत कारण इतरांच्या बापाला बाप म्हणण ही ब्राम्हणी संस्कृती आहे कारण सरस्वती आणि ब्रम्हदेव यांच नात ? जगजाहीर आहे. राज ठाकरेंचे बोलण आणि वर्तन म्हणजे जिकडे गुलाल तिकडे चांगभल अस आहे. हे असले बापाची अदलाबदल करणारे खरच शिवारायांचे संरक्षक असू शकतील ?याचा तरुणांनी विचार करावा म्हणून तर राज ठाकरेंचा समाचार घेण्यासाठी याठिकाणी प्रा. मा.म. देशमुख यांचेच शब्द उपयोगी पडतात कारण ते म्हणतात की, गाढवाने सिंहाचे आयाळ पांघरले तरी गाढवपणा कधीतरी उघडा पडतोच.
राज ठाकरेंनी तिथीनूसार शिवजयंती साजरी करण्याचे आव्हाण केल्यानंतर समाजातून त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत त्यात जगद्गुरू तुकोबाराय साहीत्य परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष बादाडे फेसबुकवर म्हणतात की, स्वतःच्या बापाचा आणि स्वत:चा वाढदिवस तारखेला साजरा करणाऱ्यांनी आधी, स्वतःचा वाढदिवस तिथीनूसार करावा अस म्हटल. शिवराय या नावाची ताकद प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितली पण ती ताकद राज ठाकरे बाबा पुरंदरेलाच माणून बसले आहेत त्यामुळे डाँ. बालाजी जाधव हे त्यांच्या ‘नाठाळाचे काठी हानु माथा’ या पुस्तकात ‘राज ठाकरे, महाराष्ट्र तुमच्या बापाचा नाही’ या प्रकरणात लिहतात की, ज्या प्रबोधनकारांनी आपल्या प्रबोधनामार्फत ब्राम्हणांचे वाभाडे काढले त्यांचेच नातू श्रीयुत राज ठाकरे यांनी ब्राम्हणशाहीला खतपाणी घालण्याचे काम करून आपल्या काकांचाच कित्ता गिरवला. कदाचित प्रबोधनकारांचे समग्र वाड्मय उभ्या महाराष्ट्रात उपलब्ध असले तरी ते ठाकरे कुटुंबियांकडे उपलब्ध नसावे यात त्यांचा दोष तो काय ?
शेवटी बहुजन समाजातील तरुणांना सागावं वाटत की, राज ठाकरे त्यांच्या मुलांचा व त्यांची पिलावळ राज ठाकरेंचा वाढदिवस तारखेप्रमाणे साजरा करतात, पण छ. शिवाजी महाराजांची जयंती मात्र तिथीप्रमाणे साजरी करण्याचा अट्टाहास करून तुम्हाला संभ्रमित करू पाहताहेत. तेव्हा तुम्ही मोठ्या हिंमतीने व एकजुटीने छ.
शिवाजी महाराजांच्या विचारांचा वर्षातील ३६५ दिवस प्रसार प्रसार व त्याचे विचार अंगिकारून त्यातील एक दिवस म्हणजे १९ फेब्रुवारी हा शिवजन्मोत्सव दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करा. उगाच एखाद्या मनोरुग्णाला तिथीची खाज सुटत असेल तर त्यावर एकच रामबाण उपाय म्हणजे तारखेनूसार साजरी होणारी शिवजयंती. हे मनोरुग्ण तिथी व तारखेच्या संभ्रमात बहुजन समाजाला अडकवून गटा तटात विभागण्याचा खोडसाळपणा करत आहेत. त्या मनोरूग्णांना नष्ट करण्याची कला प्रा. मा.म. देशमुख यांनी त्यांच्या लढा मनुवाद्यांशी या पुस्तकात सांगितली आहे, ‘माझ्या भोळ्या बहुजन बांधवा ! तू हे असे आपसात भांडणे लावणारे विष अरबी समुद्रात खोल बुडवून नष्ट करशील तरच तरशील, नाहीतर मरशील !म्हणून आतातरी ‘शिका, वाचा, संघटीत व्हा आणि मनुवादी ब्राम्हणशाहीच्या’ गुलामीतून बहुजन समाजाला मुक्त करा.’
‘एकच वारी १२ जानेवारी
जगात भारी १९ फेब्रुवारी
जिजाऊ शिवबाची जयंती
होतेय हो साजरी घरोघरी !’
✍️ रेपे नवनाथ दत्तात्रय
repe9nat@gmail.com
repe9nat@yahoo.com