मराठा पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा.रवींद्र पाटील
कबनूर ता.१९- येथील मराठा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा.रवींद्र बाबासो पाटील यांची तसेच व्हाइस चेअरमन पदी तात्यासाहेब बळवंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली.विशेष निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी एस.व्ही.मसूरकर होते.
पतसंस्थेच्या व्यवस्थापक सरोज पुजारी यांनी स्वागत केले.चेअरमन पदासाठी प्रा.रवींद्र पाटील यांचे नाव बाबासाहेब कोकणे यांनी सुचवले.त्यास संजय जाधव यांनी अनुमोदन दिले.व्हाईस चेअरमन पदासाठी तात्यासाहेब पाटील यांचे नाव बी.जी.देशमुख यांनी सुचविले.त्यास कुलदीप इंगवले यांनी अनुमोदन दिले.यावेळी पतसंस्थेचे संचालक सचिन वाकरेकर,प्रविणा पाटील,स्नेहल स्वामी आदी उपस्थित होते.नूतन चेअरमन व नूतन व्हाइस चेअरमन यांचा सत्कार माजी चेअरमन राजाराम वाकरेकर यांच्याहस्ते करण्यात आला.
फोटोओळ- प्रा.रवींद्र पाटील,तात्यासाहेब पाटील
फोटोक्रमांक-
मराठा पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा.रवींद्र पाटील
