
सांगलीत निवारा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने २१ मार्च रोजी प्रचंड घर हक्क मेळावा संपन्न!
सांगली जिल्ह्यामध्ये ज्यांना रहावयास पक्के घर नाही त्यांना त्वरित घर मिळाले पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यासाठी एक हजार पेक्षा जास्त बांधकाम कामगार उपस्थित होते. या मेळाव्याचे अध्यक्ष कॉम्रेड शंकर पुजारी यांनी सांगितले की,
भारतामध्ये ज्यांना रहावयास पक्के घर नाही अशा सर्वांना 26 जून 2022 पर्यंत पक्के घर देण्यात येईल अशी घोषणा प्रधानमंत्री यांनी सहा वर्षांपूर्वीच केली आहे. याची अंमलबजावणी करा या मागणीसाठी आणि ग्रामीण भागांमध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत घरबांधणीसाठी दोन लाख रुपये देण्याचे अर्ज मंजूर करण्याचे काम सुरू झाले पाहिजे. ग्रामीण भागामध्ये ज्यांना घर बांधण्यासाठी जमीन नाही त्यांना शासनाने जमीन उपलब्ध करून दिली पाहिजे. यासाठी त्यांचे अर्ज करण्यात येत असून हे हजारो अर्ज 28 मार्च रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिक अकरा वाजता बांधकाम कामगार संघटना मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करणार आहेत.
शहरी भागांमध्ये बांधकाम कामगार यांच्यासाठी ज्यांना घर पाहिजे त्यांचे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.
तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सध्या मिरज येते श्री शशिकांत गोखले यांनी शासकीय धान्य गोडाऊन पलीकडे मिरज येथे 250 घरकुले बांधण्यास सुरुवात केली आहे. ती घरकुले बुकिंग करण्यासंदर्भात 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता प्रकल्पाच्या ठिकाणी मिरज येथे बैठक होणार आहे. या महत्त्वाच्या घर मागणी संबंधित मेळाव्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते श्री संदीप राजोबा, गोखले कंपनीमार्फत श्री अमर गोखले, बांधकाम व्यावसायिक श्री विद्याधर पाटील यांची मेळाव्यामध्ये भाषणे झाली. मेळाव्यामध्ये असा निर्णय घोषित करण्यात आला की, 23 मार्चला मिरज येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुले बुकिंग करण्यासाठी मिरज घर प्रकल्प येथे सकाळी अकरा वाजता जमावे. 28 मार्चला सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील ज्यांना स्वतःचे घर नाही त्यांच्या घरकुलासाठी जागा मिळाले पाहिजे या मागणीसाठी बांधकाम कामगारांनी प्रचंड संख्येने जमावे असे आवाहन युनियनचे अध्यक्ष कॉ शंकर पुजारी यांनी केले. मेळाव्यामध्ये प्रास्ताविक संघटनेचे सचिव श्री विशाल बडवे यांनी केले. मेळाव्यामध्ये विद्या भोरे, सोनाली चव्हाण, ललिता पाटील, करण काळे, शुभांगी गावडे, नंदा कामटे,काका मोरे, दीपाली माळी, लक्ष्मी कारंडे, शितल जाधव,सोनाली चव्हाण,राजेंद्र मनसुळे, सुहास कदम, येशु माळी शितल मगदूम, सुरेश सुतार इत्यादी कार्यकर्त्यानी मेळाव्यामध्ये मुद्दे मांडले. निवारा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने जनरल सेक्रेटरी प्रा शरयू बडवे यांनी आभार मानले नंतर मेळावा समाप्त झाला.