अनेक मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली
नवेदानवाड:- रमेशकुमार मिठारे
दानवाड गावचे माजी सरपंच श्री पंचगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक व श्री.गुरूदत्त शुगर्स टाकळीवाडी चे जेष्ठ संचालक श्री.जे.आर.पाटील -दानवाडकर यांचे सोमवार दिनांक २१ मार्च २०२२ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, तिन मुली , नातवंडे परतवंडे असा मोठा परिवार आहे.दानवाडचे प्रगतशील शेतकरी राजु पाटील व महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे संचालक तथा रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर चे सदस्य शिवराज पाटील यांचे वडील होते.तर दत्त साखर कारखान्याचे संचालक महेंद्र बागी यांचे सासरे व जयसिंगपूर चे नगरसेवक नितीन बागे यांचे आजोबा होत.
अंत्यविधी वेळी गुरूदत्त शुगर्स चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगेसो, संचालक बबन चौगुले.माजी आमदार उल्हास पाटील, राष्ट्रवादी कांग्रेस चे शिरोळ तालुका अध्यक्ष -प्रकाश पाटील-टाकवडेकर, स्वाभिमानी संघटनेचे नेते आदिनाथ हेमगिरे, सनदी लेखापरीक्षक -भाऊसाहेब उर्फ बंटी नाईक, रामचंद्र डांगे, शिवसेनेचे नेते -वैभव उगळे व कर्नाटक-महाराष्ट्र भागातील जेष्ठ नेते मंडळी, रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर चे सदस्य, गावातील व परिसरातील गावकऱ्यांनी स्वर्गीय जे.आर पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.रक्षाविसर्जन बुधवार दिनांक २३ मार्च रोजी सकाळी ८:३० वाजता जुने दानवाड येथे आहे.