मुंबई : विधान परिषदेचे विरोधपक्ष नेते प्रविण दरेकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सत्र न्यायालयामध्ये बुधवारी सुनावणी होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने आपली भूमिका मांडण्यासाठी दोन दिवसांचा अवधी द्यावा, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. ही विनंती मान्य करत न्यायालयाने पुढील सुनावणी बुधवारी ठेवण्याचे जाहीर केले. तसेच पुढील सुनावणीपर्यंत दरेकरांवर कोणतीही कारवाई करु नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले.
मुंबै बँक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये देरकरांनी मजूर म्हणून निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात गुन्हा रद्द करण्यासाठी धाव घेतली होती.मात्र हायकोर्टात त्यांची याचिका फेटाळण्यात आली. यानंतर दरेकरांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका केली होती. सत्र न्यायालयाने दरेकरांना 21 मार्च रोजीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. मुदताची आज शेवटचा दिवस असल्यामुळे आज सत्र न्यायालयात सुनावणी झाली.