पंजाबमध्ये काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर पक्षात बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांना पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले. सिद्धू यांनी काँग्रेस हायकमांडच्या आदेशाचे पालन केले आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी सोनिया गांधी यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह सर्व निवडणूक राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितले होते.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करून पंजाब प्रदेश समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. सिद्धू यांनी लिहिले की, “काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांच्या इच्छेनुसार मी माझा राजीनामा पाठवला आहे.”
काँग्रेस पक्षाला पाचपैकी एकाही राज्यात सरकार स्थापन करता आले नाही. पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ 18 जागा जिंकता आल्या. अमृतसर पूर्व मतदारसंघातून नवज्योत सिंग सिद्धू यांचा आम आदमी पक्षाच्या उमेदवाराकडून पराभव झाला आहे. काँग्रेसच्या पराभवानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.