IPL 2022: KKRला मोठा झटका, स्पर्धेचे पहिले ५ सामने खेळू शकणार नाहीत हे दिग्गज क्रिकेटर

IPL 2022: KKRला मोठा झटका, स्पर्धेचे पहिले ५ सामने खेळू शकणार नाहीत हे दिग्गज क्रिकेटर

कोलकाता नाइट रायडर्स (KKR)ला आयपीएल २०२२(IPL 2022)च्यासुरूवातीच्या सामन्यांआधीच मोठा झटका बसला आहे केकेआर (Kolkata knight riders)चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स((Pat Cummins) आणि आरोन फिंच (Aaron Finch) कोलकाताच्या पहिल्या ५ सामन्यांमधून बाहेर आहेत. याला दुजोरा मेंटर डेविड हसीने एका पत्रकार परिषदेत दिला.

केकेआरनने आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात पॅट कमिन्सला ७.२५ कोटी रूपयांना खरेदी केले होते. दुसरीकडे आरोन फिंचला इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सच्या रिप्लेसमेंटसाठी सामील करण्यात आले होते. केकेआरचे मेंटर डेविड हसी यांना असे वाटते की उपलब्ध झाल्यानंतर दोघेही खेळाडू मॅच फिट असतील आणि लगेचच मैदानात उतरतील.

हसीने सांगितले, हा खरंतर चिंतेचा विषय आहे. तुम्हाला वाटतं असतं की तुमचे सर्वोत्कृष्ट खेळाडू उपलब्ध असावेत मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्राथमिकता असली पाहिजे. प्रत्येक क्रिकेटरने आपल्या देशासाठी आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले पाहिजे कारण त्यासाठी ते करारबद्ध आहेत. कमिन्स आणि फिंच पहिले ५ सामने खेळू शकणार नाही मात्र ते क्रिकेटसाठी फिट आणि तयार असतील.

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तानी दौऱ्यावर आहे. येथे कसोटी मालिकेनंतर ते वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा हा दौरा ५ एप्रिलला पूर्ण होईल. त्यानंतर या खेळाडूंना क्वारंटाईन राहावे लागेल. यानंतर १० एप्रिलला हे दोन्ही खेळाडू संघात येतील. केकेआर आपला ५वा सामना १० एप्रिलला खेळणार आहे.

श्रेयस कोलकाताचा कॅप्टन

कोलकाता नाईट रायडर्सनने काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या अधिकृत हँडलवरून श्रेयस अय्यरला कॅप्टन केल्याचे जाहीर केले होते. लिलावात जेव्हा त्यालाखरेदी करण्यात आले तेव्हा त्याच्या हाती नेतृत्व जाणार अशी चर्चा सुरू होती. याआधी सौरव गांगुली, गौतम गंभीर, जॅक कॅलिस, दिनेश कार्तिक आणि इयॉन मॉर्गन यांनी कोलकाताच्या नेतृत्वाची धुरा सांभाळी होती. कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरला १२.२५ कोटींना खरेदी केले होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *