*बौद्धांनी धर्म बौद्ध आणि जात लिहून अनुसूचित जाती चे अधिकार घेऊ नका आणि घ्यायचे असल्यास धर्म हिंदू आणि जात लिहून घ्या, कारण sc कॉलम फक्त हिंदू साठी असतो, बौद्ध म्हणजे केवळ बौद्धच असतो sc नसतो, असे म्हणून हिंदूंची लोकसंख्या वाढवणारे आणि बौद्धांना संविधानिक अधिकार नाकारणारे १००% रा. स्व. संघाचे हस्तकच असू शकतात!!!!*
————————————-
✍️महेंद्र बनसोडे
9322554095
________________________
बौद्ध वस्ती मध्ये काही तथाकथित बौद्ध (Rss चा हिंदु लोकसंख्या वाढवण्यासाठी व बौद्ध लोकांचे संविधानिक अधिकार खतम करण्यासाठी काम करत आहेत) जे बौद्ध धम्म व संविधान विरोधक आहेत, दारोदार फिरून जे तुम्हाला चुकीचे सल्ले देणार आहेत…! तेव्हा सावधान!!!
संविधान अनुच्छेद 341 नुसार 1990 दुरुस्ती मुळे संविधानिक अधिकार बौद्ध लोकांना सुद्धा Sc म्हणून मिळतात, त्या साठी अनुच्छेद 46 नुसार संविधानिक जनगणना असते. ज्या मद्धे अनुसूचित जाती ची लोकसंख्या समजते कारण sc व st यांची जाती निहाय जनगणना होत असते, जी मागणी obc 40 वर्ष झालं करत आहे, कारण जातीनिहाय जनगणनेत निश्चित आकडा समजतो व त्या नुसार हिस्सेदारी मिळते.
मूळ मुद्दा असा की महाराष्ट्र मद्धे 154 जाती या अनुसूचित जाती यादीत आहे , ज्या सर्वांची लोकसंख्या जवळपास 1.5 करोड इतकी आहे, ज्या मद्धे 1 जात सूचित आहे ती म्हणजे (महार 37) ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकार केला आहे, त्यांची लोकसंख्या जवळपास 1 कोटी आहे, उर्वरित 153 जातीमधील sc लोकसंख्या ही जवळपास 50 लाख आहे, याचा अर्थ सरळसरळ असा की बौद्ध sc 37 यांनी जर जनगणनेत sc नोंद केली नाही तर 1 कोटी sc कमी होतील, आणि बौद्ध लोकांचे 341 मधील अस्तित्व नष्ट होईल. जो या तथाकथित लोकांचा मुख्य अजेंडा आहे.
संविधान अनुच्छेद 25 नुसार व 1990 जाती आदेशानुसार अनुसूचित जाती चा कोणताही व्यक्ती आपला धर्म बुद्धिस्ट लिहुच शकतो व संविधानिक अनुच्छेद 341 sc अधिकार नियोजन करिता जी संविधानिक नोंद म्हणजे SC CASTE लिहिणे शहाणपण आहे, धर्म बुद्धिस्ट प्रवर्ग SC व SC मधील अनु क्र XYZ व CASTE XYZ लिहून आपले संविधानिक व धम्म ज्ञान दाखवणे काळजी गरज आहे. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, या अतिविद्वान लोकांचा संविधानिक व धम्म विषयी काडी चा स्टडी केलेला नाही, कोणतीही पर्यायी व्यवस्था यांनी केली नाही, हवेत गोळीबार करणारी टीम आहे.
हे अतिविद्वान लोक दारात येताच सर्वात आधी यांना विचारा की कास्ट सर्टिफिकेट कधीच काढले नाही का तुम्ही ? जर नाही म्हटले तर तो SC नसून आपल्या हक्कावर पाणी फिरवायला आला म्हणून हाकलून लावा व जर हो म्हटला तर तिथेच कानाखाली द्या की ज्या ताटात खातोस त्याच ताटात शी करतोस म्हणून !
कोणताही देश आपल्या खात्यात पैसे टाकणार नाही, कोणीही आपल्या लेकराची हायर एज्युकेशन ची फी देणार नाही,
कायदेशीर संविधान प्रोटेक्शन यातील कोणीही देणार नाही, यांच्या नादी लागून आपल्याच पायांवर दगड मारून घेऊ नका.
जनगणना ,शाळा,कॉलेज, सर्व्हिस , दवाखाना यात सगळीकडे आपली नोंद :-
धर्म : हिंदू नव्हे तर बुद्धिस्ट
प्रवर्ग : SC
कास्ट : महार, इत्यादी अशी करा.
कोणालाही घाबरून धर्म हिंदू लिहू नये, हिंदू लोकसंख्या वाढवू नयेत, धर्म बुद्धिस्ट लिहून बौद्ध लोकसंख्या वाढवा पण सोबत sc नोंद करून आपले संविधानिक अधिकार सुरक्षित राखा, हे लक्षात असू द्या.
अनुसूचित जाती (दुरुस्ती 1990 आदेश) नुसार धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जाती चे प्रतिनिधित्व लागू केले आहे, म्हणजे (जनगणना, शाळा, सर्व्हिस) इत्यादी सर्व ठिकाणी आपली नोंद धर्म बौद्ध व जी सुचिबद्ध जात असेल तीच लिहावी लागेल , हेच संविधानिक अंतिम सत्य आहे. (नमुना 7/ नवबौद्ध किंवा उच्चवर्णी बौद्ध )◀️(रद्द दाखला) धारक लोक आहेत त्यांचा (1990 दुरुस्ती) सोबत काहीही संबध नाही, नमुना 6 दाखल्या नुसार लीगल स्टेटस धर्म (हिंदू❌बौद्ध ✅- जात महार इ.) हेच आहे, यात बदल (नविन समुह सुचिबद्ध) करने केंद्र /राज्य सरकारचे काम आहे.
बौद्ध धम्मात “जाती caste, जमाती tribes आणि वर्ग class” अस काहीही नसते, पण संविधानिक अधिकार आम्हला sc st obc या वर्गवारी आकडेवारी नुसार मिळतात, म्हणजेच संविधान अनुच्छेद 15,16,17,338,339,340 obc, 341 sc,342 st, 330,366-24/25 मधून सामाजिक,शैक्षणिक,नोकरी तसेच राजकीय अधिकार मिळतात, अनुच्छेद 25 नुसार तमाम भारतीय सहित sc st obc ना आपला धर्म कोणता स्वीकार करावा, आचरण करावा आणि नोंद करावा याचे मूलभूत अधिकार मिळतात आणि या सर्व sc st मधील नियोजन करीता जी लोकसंख्या गरजेची असते ती अनुच्छेद 46 नुसार दर दहा वर्षांनी होणार्या जनगणनेवर निर्धारित असते. त्या मुळे जनगणेत आपली नोंद sc म्हणून करू नका , फक्त बौद्ध धार्मिक नोंद करा, sc yes केल्याने बौद्ध धम्मात जाती घुसतात, असे म्हणणे संविधानिक अज्ञान आहे, जो असा प्रचार करतो त्याला सायमन कमिशन, गोलमेज परिषद, पुणे करार , गवरहमेन्ट ऑफ इंडिया act 1935, संविधान अनुसूचित जाती आदेश 1950 ( सोबत दुरुस्ती 1990) याबद्दल काहीच कळत नाही हे सिद्ध होते, अनुच्छेद 46 त्याला समजला नाही हे सिद्ध होते आणि सगळ्यात मोठा मूलभूत अधिकार अनुच्छेद 25 जो सर्व sc st obc जनरल ला लागू आहे, यातील कोणताही व्यक्ती आपल्या प्रवर्ग सोबत, विशेष sc st प्रवर्ग (obc जातीनिहाय होत नाही) आपला धर्म बुद्धिस्ट म्हणून स्वीकार , आचरण आणि नोंदणी (शाळा, जनगणना, सर्व्हिस इत्यादी ठिकाणी ) करु शकतो, याला कोणीही विरोध करूच शकत नाही.
संविधानिक sc 341 मधील sc लोकसंख्या कमी करणे हे भविष्यात तमाम sc ज्या मध्ये एकटे 37 महार मधून बौद्ध हे 1 कोटी आहेत, ज्या आधारावर इकडे नियोजन असते, महाराष्ट्रात अनुसूचित जाती मध्ये एकूण 154 जाती आहेत ज्यांना 59 मध्ये सुचिबद्ध केले आहे, त्या 59 अनुक्रमांक मधील 37 अनुक्रमांक वर 4 जाती आहेत त्यापैकी एक महार आहेत, ही महार लोकसंख्याच एकटी 1 करोड च्या वर आहे मग उर्वरित 153 जातीचे लोक मिळून 50 लाख आहेत फक्त, म्हणजे sc लोकसंख्या कमी होऊ न देण्याची 100% जवाबदारी फक्त 37 महार म्हणून आरक्षण घेणार्या लोकांचीच आहे, बाकी 50 लाख लोक तर त्यांची नोंद करतात.
संविधानिक अधिकार sc st म्हणून घेतल्याने आजवर बौद्ध धम्मात जाती घुसल्या नाहीत, तर त्या अधिकार नियोजन करिता जी संविधानिक जनगणना आहे त्यात आपली नोंद (data collection) करिता केल्यानेच बौद्ध धम्मात जात घुसते असे म्हणणे किमान आंबेडकरी बौद्ध व्यक्तीस शोभणारे नाही.
बौद्ध धम्मात जमाती नसतात पण नॉर्थ इस्ट चे बुद्धिस्ट लोक 99% बौद्ध आहेत, ज्यांना त्यांचे संविधानिक अधिकार st सर्टिफिकेट नुसार मिळतात, ते आपला धर्म बुद्धिस्ट लिहितात आणि प्रवर्ग st आणि समोर सुचिब्ध जी जमात असेल ती लिहितात, पण ते असे म्हणत नाहीत की बौद्ध धम्मात जमाती घुसल्या, विशेष म्हणजे ते आपल्या शेकडो वर्षापूर्वी चे बुद्धिस्ट आहेत, ही संविधानिक जागरूकता आपण पाळू या.
~~~~~~~~~~~~~~~~