नोकरीच्या (Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगातर्फे (SSC) विविध पदांसाठी निवडप्रक्रिया (recruitment) राबविण्यात येत आहे. 10वी पास उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. यात मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (नॉन टेक्निकल) आणि हवलदार पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी नोटिफिकेश जारी करण्यात आले असून 1 जून 2022 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया निवड प्रक्रियेबाबत अधिक माहिती…
महत्वाच्या तारखा –
या भरती प्रक्रियेअंतर्गत 22 मार्च 2022 पासून उमेदवारांचे अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2022 आहे. 30 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज शुल्क देखील भरायचा आहे. जूनमध्ये पहिला सीबीटी (CBT) पेपर होईल. तर दुसर्या पेपरबाबत अद्याप माहिती देण्यात आली नसून लवकरच कर्मचारी निवड आयोगातर्फे याबाबत माहिती देण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
ज्या इच्छुक आणि पात्र उमेवारांना या भरती प्रक्रियेसाठी (SSC MTS Exam) अर्ज करायचा आहे ते 10वी पास असणे गरजेचे आहे. सीबीएनमध्ये एमटीएस पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 तर सीबीआयसी (राजस्व विभाग) विभागात हवलदार आणि एमटीएस पदांसाठी उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षाच्या आता असावे. आरक्षित वर्गासाठी सरकारी नियमांनुसार वयात सूट देण्यात आली आहे.
अशी होईल निवड
एसएससी एमटीएस आणि हवलदार पदासाठी योग्य उमेदवारांची तीन टप्प्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. यात संगणकावर आधारित परीक्षा- पेपर 1, शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) किंवा शाररिक मानक चाचणीने (PST) (फक्त हवालदार पदासाठी) आणि एक वर्णनात्मक- पेपर 2 होईल.
असा करा अर्ज
या भरती प्रक्रियेअंतर्गत सीबीआयसी आणि सीबीएनमधील हवलदार पदाच्या एकूण 3603 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी कर्मचारी निवड आयोगाच्या (SSC) अधिकृत संकेतस्थळ SSC.nic.in वर जाऊन 30 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज कारायचा आहे. सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांसाठी 100 रुपये अर्ज शुल्क द्यावे लागेल. तर महिला उमेदवार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग आणि माजी सैनिकांना शुल्कात सूट देण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसरा वेतन देण्यात येणार आहे.