तालुकास्तरीय शाळापूर्व तयारी प्रशिक्षण ग.सा. कें. भिवापूर येथे संपन्न
भिवापूर // रजत डेकाटे ✍️
शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत दोन दिवसीय तालुकास्तर प्रशिक्षण गटसाधन केंद्र पंचायत समिती भिवापूर येथे दिनांक 22 व 23 मार्च 2022 रोजी मा.विजय कोकोडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भिवापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.दिलीप शहारे विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत गट साधन केंद्र भिवापूर येथील सभागृहात पार पडले. दाखल पात्र विद्यार्थ्यांची शाळा पूर्व तयारी होण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणात तज्ञ सुलभक म्हणून संजय खोब्रागडे सर व मेघा गुरनुले मॅडम यांनी काम पाहिले. प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थी येडस्कर सर तसेच पोहेकर मॅडम यांनी प्रशिक्षणाच्या उपयोगिते बाबत मनोगत व्यक्त केले तर आभार राजू नवनागे सर यांनी मानले. प्रशिक्षणाच्या यशस्वितेसाठी गटसाधन केंद्र पंचायत समिती भिवापूर येथील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.