कळमनुरी : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर शिवसेनेचे कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी निवणुकीत 1 हजार कोटी रुपये घेतले असा आरोप करत एकेरी भाषेचा उल्लेख केला. या वक्तव्याच्या विरोधात आज कळमनुरी येथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक होत आमदार बांगर यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी “निषेध असो निषेध असो , बांगरचा निषेध असो” अशा घोषणा देखील या वेळी देण्यात आल्या. या प्रसंगी कळमनुरी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
पुरावे सादर न केल्यास कळमनुरीत आमदार संतोष बांगर ताफा अडवून पुरावे मागतील. पुरावे दिले नाही तर कळमनुरी तालुक्यात फिरू देणार नाही. असा थेट इशाराच वंचितच्या कार्यकर्त्यानी आमदार बांगर यांना दिला आहे.
यावेळी कळमनुरी तालुकाध्यक्ष प्रा.भगवान मस्के , जिल्हा सल्लागार हिंगोली मोबिन शेख , तालुका मुखु संघटक प्रियानंद घोड़गे, तालुका महासचिव राजू कांबळे ,तालुका उपाध्यक्ष आकाश मोगले , सचिव शंकर खिल्लारे, जेष्ठ कार्यकर्ते ये.जी.सिरसाठ ,भास्कर पाईकराव,शिवाजी सुतारे,प्रदीप मोगले,समाधान बलखंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.