⭕️ स्टेशन रोडवरील काही काळ वाहतूक विस्कळीत
कबनूर प्रतिनिधी/ चंदुलाल फकीर
इचलकरंजी : शहरातील नवीन नगरपालिकेचे जवळ स्टेशन रोड गुरू टाकी चौक येथे विचित्र अपघात होऊन एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला आहे.अपघातामुळे स्टेशन रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीसनिरीक्षक वाघमोडेसाहेब व शहर वाहतूकचे पोलिस दाखल झाले होते .अपघातस्थळी मिळालेली माहिती अशी, चौगुले बोरवेलची गाडी, इंडिका गाडी व फॅशनप्रो मोटरसायकल यांचा भीषण अपघात होऊन मोटर सायकल गाडी नंबर MH 09 CS 4737 चा गाडी चालक मनोज मोरया राहणार जेके नगर तारदाळ वय वर्ष ३५ जागीच ठार झाला तर एक जण जखमी झालेला असून इंडिका गाडी मधील चारजण किरकोळ जखमी झाले आहेत उपचाराकरता त्यांना एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. बोरवेल गाडी पलटी मारल्याने अपघाताची भीषणता पाहून बोरवेल गाडी चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे अधिक तपास पोलीस करत आहेत.