परचुरी येथे नदीमध्ये बुडून बेपत्ता झालेल्या दोन तरुणांचे मृतदेह सापडले

परचुरी येथे नदीमध्ये बुडून बेपत्ता झालेल्या दोन तरुणांचे मृतदेह सापडले

संगमेश्वर : तालुक्यातील परचुरी येथे बावनदीमध्ये बुडून बेपत्ता झालेल्या दोन तरुणांचे मृतदेह रविवार दिनांक २७ मार्च रोजी सकाळी शोध मोहिमेदरम्यान ग्रामस्थांना मिळून आले आहेत. परचुरी कळंबटेवाडी येथील प्रमोद रामचंद्र कळंबटे (वय ३५वर्ष), संकेत सहदेव कळंबटे( वय १२ वर्ष ) व अन्य सात जण परचुरी येथील बावनदी मध्ये शनिवारी दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान पोहायला गेले होते.

नदीमध्ये पोहोत असताना संकेत कळंबटे याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला तसेच तो पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहत गेला. संकेत याला वाचविण्याच्या प्रयत्नात प्रमोद कळंबटे पाण्यामध्ये बुडाला. नदीला भरती आल्याने हे दोघेही नदीमध्ये बुडन बेपत्ता झाले. प्रमोद व संकेत यांच्याचबरोबर आलेल्या पाच जणांनी आरडाओरड केल्याने हा प्रकार ग्रामस्थांना कळला.

संगमेश्वर पोलिस ही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. होडीच्या साहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली. सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रमोद व संकेत हे मिळून आलेले नाहीत. काळोख पडल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. रविवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. शोध मोहीम सुरू असताना सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास प्रमोद कळंबटे याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना ग्रामस्थांना दिसून आला. ग्रामस्थांनी हा मृतदेह पाण्याबाहेर काढला.

यानंतर होडीच्या सहाय्याने संकेत याचा शोध सुरू होता. १०.१५ वाजता संकेत याचा मृतदेह मिळून आला. या शोध मोहिमेत ग्रामस्थांसह संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण देशमुख, सचिन कामेरकर, प्रशांत शिंदे, उशांत देशमवाड उपस्थित होते. प्रमोद व संकेत यांच्या अचानक जाण्याने परचुरी गावावर शोककळा पसरली आहे. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात संकेत व प्रमोद यांच्या शवाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले . शोकाकुल वातावरणात दोघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *