चिपळूण : उडपी रेल्वे स्टेशन ते चिपळूण रेल्वे स्टेशन असा गाडी नं. १२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेस गाडीचे बोगी एस १०, सीट नं. ३९ वरुन प्रवास करीत असताना एकूण १ लाख २० हजार रुपये किंमतीचे २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व ५ ग्रॅम वजनाचे पेन्डेल अज्ञात व्यक्तीने चोरून नेले.
ही घटना दि. १ मार्च रोजी रात्री ११ वाजता ते दि. २ मार्च रोजी १२ वाजताच्या दरम्याने घडली. फिर्यादी सुशिला सुधाकर शेट्टी (वय- ७३, रा. रुम नं. ३०१, तिसरा माळा इंडियन ऑईस म्हाडा गोवंडी) हे मत्स्यगंधा एक्सप्रेसने उडपी रेल्वे स्टेशन ते चिपळूण रेल्वे स्टेशन असा रेल्वे प्रवास करीत असताना फिर्यादी यांच्या झोपेचा फायदा घेऊन कोणीतरी पिवळ्या पिशवतील सफेद रंगाच्या रुमालात ठेवलेली एक लाख २० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन व पेन्डल चोरुन नेले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.