मिरज (प्रतिनिधी) : मिरजेचे सुपूत्र व प्रसिध्द हृदयरोग तज्ज्ञ व अल्पावधीत लहान बालकांपासून वृध्दांपर्यंत अवघड शस्त्रक्रिया करून असंख्य रूग्णांना जीवदान देणार्या डॉ.रियाज उमरसाहेब मुजावर यांचा आरोग्यराज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते व प्रदेश जनतादल अध्यक्ष माजी आ. प्रा. शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. रियाज मुजावर गौरव समितीच्यावतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
हा सत्कार सोहळा शनिवार दि.२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वा. इंडियन मेडिकल असोसिएशन(आयएमए) हॉल, शिवाजीरोड मिरज येथे होणार आहे. भाजपा प्रदेश सरचिटणीस मकरंदभाऊ देशपांडे, माजी महापौर इद्रिस नायकवडी, माजी महापौर किशोर जामदर, महापालिका विरोधीपक्ष नेता संजय(बापू) मेंढे, माजी सभापती सुरेश(बापू) आवटी, मा. नगरसेवक अनिल कुलकर्णी, माजी महापौर संगीता खोत, कोषाध्यक्ष नानासाहेब पीरजादे, ऍड.फैय्याज झारी आदि मान्यवर सदर सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थितीत राहणार आहेत.