चिपळूण : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने तसेच रत्नागिरी महिला आघाडीच्या जिल्हा निरीक्षक स्मिता गवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचा तिसरा वर्धापन दिन रविवार दि. दि. 27 मार्च रोजी चिपळूण येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच महिला संवाद मेळावाचे हि यावेळी आयोजन करण्यात आले होते.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ तीन वर्षांपूर्वी विलीन करून वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली. आंबेडकरांच्या कल्पनेतून राज्यातील तळागाळातील समाजाला न्याय व सत्तेत वाटा मिळण्याकरिता सर्व वंचित घटकांना एकत्रित करून राज्यात तिसरी आघाडी उदयास आणली. या आघाडीच्या माध्ययमातून राज्यात वंचितांच्या समस्या , सामाजिक राजकीय व सांस्कृतिक वारसा जपत अनेक आंदोलने करण्यात आली. वंचितांना सत्तेत वाटा मिळवण्यासाठी राजकीय संघर्ष वंचित आघाडीने निर्माण केला आहे. वंचितच्या संघर्षाने राज्य शासन विचलित होऊन त्यांना भागीदारी देण्यासाठी महत्वाची पाऊले उचलली जात आहेत.
वंचित बहुजन महिला आघाडीच्या ‘महिला संवाद मेळावा’ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरी जिल्हा निरीक्षक स्मिता गवळे होत्या. तर प्रमुख वक्त्या म्हणून बालवाडी प्रशिक्षक प्राध्यापिका वैदेही सावंत व रत्नागिरी रेल्वे पोलीस सहाय्यक अधिकारी प्रतिभा साळुंखे यांनी उपस्थित महिलांना मोलाचे असे मार्गदर्शन केले.
वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा निरीक्षक स्मिता गवळे यांनी वर्धापण दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्या म्हणाल्या की, रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने निष्ठावंत महिला कार्यकर्त्यांची फळी निर्माण होत आहे. येणाऱ्या पं. स. , जि. प. निवडणुकीत वंचितची सत्ता स्थापन करण्याचा दृष्टीने महिला कार्यकर्त्यानी कामाला लागावे, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
त्यानंतर संवाद मेळाव्यास संबोधित करताना प्रतिभा साळुंखे म्हणाल्या की, देत म्हणाल्या कि, बहुजन वर्गातील महिलांनी राजकारणात सहभाग घेतला पाहिजे. संविधानाने त्यांना हि संधी उपलब्ध करून दिली आहे. महिलांनी टीव्ही बघण्यात वेळ वाया न घालवता स्वत:मधील अंगभूत क्षमता, कौशल्य व धाडस यांचा मेळ घालून नव्या उमेदीने जगण्याला सामोरे जावे.
बहुजन समाजातील महिलांनी सावित्री माईचा विचार आत्मसात केला पाहिजे. राजकीय पक्षात महिलांना संधी एक परिवर्तनशील पक्ष वंचित बहुजन आघाडी देत आहे. त्याकडे विचारपूर्वक पाहावे, असे प्राध्यापक वैदेही सावंत यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले.
या कार्यक्रमासाठी अनेक महिला कार्यकर्त्यां आदी उपस्थित होत्या. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.क्रांती कदम यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ. अरुणा कांबळे यांनी मानले.