कबनूर उसातील पाळण्याचे दर कमी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण सुरु
कबनूर-(प्रतिनिधी चंदुलाल फकीर) कबनूर येथील दोन वर्षानंतर गुरुवार दि.३१.०३.२०२२ रोजी मोठ्या प्रमाणात भरणाऱ्या ऊरसातील पाळण्याचे दर कमी करावेत याकरता सामाजिक कार्यकर्ते कुंदन आवळे व फिरोज फकीर यांनी कबनूर मुख्य चौकात दर्गा कट्ट्यावर आमरण उपोषण सुरू केले आहे. तब्बल दोन वर्षानंतर मोठ्या प्रमाणात भरणाऱ्या कबनूरच्या उरूसामधील पाळण्याचे दर हे सर्वसामान्य व गोरगरिबांना न परवडणारे असे लावलेले असून हे दर परवडणारे नसल्याने कबनूर मधील सामाजिक कार्यकर्ते, तरुण मंडळे व नागरिकांनी उरूस कमिटीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना याबाबतचे निवेदन दिले यावर बरीच चर्चा झाली परंतु काही तोडगा निघाला नाही दोघेही पाळणा दरावर ठाम राहिल्याने कबनूर मधील सामाजिक कार्यकर्ते कुंदन आवळे व फिरोज फकीर यांनी कबनूर येथील दर्गा कट्ट्यावर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. सध्या असणारे प्रत्येक पाळण्याच्या दरामध्ये फक्त दहा दहा रुपयेने दर कमी करावेत अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे उपपोषणा मधील कुंदन आवळे यांची तब्येत बी.पी. डाऊन होऊन खालावत आहे उपोषण ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा,ॲम्बुलन्स, पोलीस, डॉक्टर दिले नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते अजित खुडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले उपोषणकर्त्यांना कमी-जास्त झाल्यास संबंधित व्यक्ती त्यास जबाबदार राहतील असे त्यांनी सांगितले सदर उपोषणास कबनूर मधील सामाजिक संघटना बरोबरच दत्ता पाटील, बाळू कामत, अजित खुडे, रवींद्र धनगर, सागर कोले, विकास फडतारे,राहुल महालींगपुरे ,युवराज कांबळे, कलावती जनवाडे, व गावातील सामाजिक कार्यकर्ते ,नागरिकांनी पाठिंबा दिलेला आहे.
Posted inकोल्हापूर
कबनूर उसातील पाळण्याचे दर कमी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण सुरु
