देवगड शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून कालच्या मध्यरात्री ही घटना घडली असावी देवगड स्टँड समोरील रॉयल बेकरी, म्हापसेकर यांचे पान पट्टी चे दुकान, तारी यांचे कॉस्मेटिक दुकान यांच्या दुकानावर पुन्हा एकदा चोरट्याने फोडली आहेत गेल्या काही महिन्यातील ही तिसरी चोरी आहे
15 मार्च रोजी देवगड कॉलेज येथील सोहम कलेक्शन व रॉयल बेकरी यांच्यावर चोरट्यांनी डल्ला टाकण्याचा प्रयत्न यावेळी चोरटे स्पष्ट सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाले होते. पुन्हा एकदा चोरट्यांनी देवगड एसटी स्टँड येथील रॉयल बेकरी तसेच म्हापसेकर,तारी यांच्या दुकानात चोरी केली आहे.
रॉयल बेकरी मधून सुमारे सहा हजाराची कॅश चोरट्यांनी लांबविली आहे तसेच बेकरी बाहेर असलेले दोन सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आहेत रामचंद्र मापसेकर यांच्या दुकानातून सुमारे अडीचशे रुपयाची रक्कम चोरट्यांनी नेली आहे तर यांच्या कॉस्मेटिक दुकानातून तीन हजार रुपयांची कॅश चोरट्यांनी नेली आहे
देवगड पोलीस आणि शॉन पथक मागवले या शॉन पथकाने देवगड हायस्कूल समोरील देवदुर्ग कॉम्प्लेक्स पर्यंत चोरा चा माग काढला मात्र त्यानंतर तो पुढे जाऊ शकला नाही