कोल्हापूर मेडिकल हब विकसित होण्यासाठी परदेशी आणि परप्रांतातील रुग्णांना सहभागाची यंत्रणा उभी करणेत एनजीओने प्रयत्न करावा : जिल्हाधिकारी रेखावर
कोल्हापूर –
कोल्हापूर आंतरराष्ट्रीय दर्जाची यंत्रसामुग्री आणि तांत्रिक क्षमता याच बरोबरीने अत्यंत कुशल वैद्यकीय मनुष्यबळ कोल्हापुरात उपलब्ध आहे. त्यामुळे कोल्हापुरात मेडिकल हब विकसित होण्यास मोठी संधी आहे . त्यासाठी परदेशांतील परप्रांतातील रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना संपर्क साधणारी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्यात स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केली.
अपेक्स हॉस्पिटल मधील कोलंबिया येथील मारिया या महिला रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या आपल्या घरी परत जाताना त्यांना शुभेच्छा देताना जिल्हाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
वैद्यकीय विश्वातून कोल्हापुरात प्रगतीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहे मात्र त्यासाठी संबंधित वैद्यकीय दवाखाने यंत्रणा तसेच शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय साधून एकत्रित काम होणे गरजेचे आहे आणि त्याची भक्कम सुरुवात यापासून होत असल्याबद्दल त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या प्रारंभी अपेक्स हॉस्पिटल च्या वतीने डॉक्टर जयंत जैन आणि प्रशासकीय अधिकारी अंजली संकपाळ यांनी जिल्हाधिकारी रेखावार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर कोल्हापूर वासियांच्या तर्फे राहुल रेखावार रुग्णास पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण शुभेच्छा दिल्या .
यावेळी अपेक्स हॉस्पिटल चे गेली दोन वर्ष सदर रुग्णाच्या संपर्कात राहून समुपदेशन आणि चॅटिंग द्वारे कोल्हापुरात येण्यास सकारात्मक मानसिकता करणारी आणि स्वतः उपचार करणारे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर जयंत जैन यांचेही राहुल रेखावार यांनी विशेष अभिनंदन केले या सोहळ्यास सुलभा देशपांडे, अपेक्सचे
निरंजन राठोड , डॉ. उमेश जैन , डॉ.चेतन जुमरानी , डॉ. संदीप कदम डॉ.,सुशांत गुणे तसेच सागर ठाणेकर , शायरन चे राजेंद्र मकोटे आदी उपस्थित होते .
कोल्हापूर मेडिकल हब विकसित होण्यासाठी परदेशी आणि परप्रांतातील रुग्णांना सहभागाची यंत्रणा उभी करणेत एनजीओने प्रयत्न करावा : जिल्हाधिकारी रेखावर
