नवे दानवाड ता.शिरोळ येथे जि.प.सदस्य, दलितमित्र मा.श्री.अशोकराव माने(बापू) यांच्या अनु.जाती व नवबौध्द वस्ती विकास योजना अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर व महात्मा जोतिबा फुले नगर येथे 14 लाख रुपये निधीचे रस्ता कॉंक्रीटीकरण कामाचा शुभारंभ गावातील विधवा महिलेच्या शुभ हस्ते करण्यात आला. गावचे लोकनियुक्त सरपंच श्रीमती.वंदना हरीचंद्र कांबळे यांनी स्री सन्मान वैचारिक अंगीकरून गावात अभिनव पद्धतीने गावात विकास कामाचा शुभारंभ घेतला. गावातील विधवा महिला व सरपंच सर्व ग्रा.प.सदस्य यांनी दलितमित्र अशोक माने यांचा आभार मानला.
या कार्यक्रम शुभारंभ प्रसंगी ग्रा.प सदस्य शहनुर गवंडी, सदस्या कमल कांबळे, शोभाताई परीट, संगीता कांबळे, मा सरपंच संजय धनगर, मा सरपंच प्रकाश परीट, राहुल राज कांबळे ,मा.ग्रा.प सदस्य बुरान लाडखान, सूर्यकांत बेरड, असलम सनदी, मा. सैनिक शहानूर नदाफ, मा. सैनिक दिलीप कांबळे, रामा बेरड,श्रीकांत बेरड, प्रकाश बेरड, मामु लाडखान इ.नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
नवे दानवाड गावात 14 लाख रुपये निधीचे रस्ता कॉंक्रीटीकरण कामाचा शुभारंभ
