पुणे : स्वयंपाकच्या गॅस सिलिंडचा मंगळवारी मोठा स्फोट झाला. पुण्यातील कात्रज भागातील गंधर्व लॉनजवळ असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये हा अपघात घडला. एकापाठोपाठ दहा सिलिंडरचा एकाचवेळी स्फोट झाला त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहेत. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या आगीत एकजण किरकोळ जखमी झाला असून अग्निशमन दलाची सहा वाहने घटनास्थळी आहेत. कात्रज भागातील गंधर्व लॉनजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये सिलेंडरचा साठा करून ठेवण्यात आला होता. पत्र्याच्या शेडमध्ये सिलेंडरचा बेकायदेशीर साठा कऱण्यात आला असल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे.