रत्नागिरी : दिनांक 29 मार्च 2022 रोजी जिल्हयातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक पुरस्कार वितरण समारंभ जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवजी सभागृहामध्ये संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. डॉ. इंदुराणी जाखड या होत्या. यांच्या सोबत मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, श्री. डॉ. अनिरुध्द आठल्ये मा. जिल्हा शल्यचिकित्सक, श्रीम. डॉ. संघमित्रा फुले तसेच श्री. डॉ.राजन शेळके माता बाल संगोपन अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी डॉ.महेंद्र गावडे तालुका आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी हे उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये जिल्हयातुन सर्वाधिक कामावर आधारीत मोबदला मिळवणाऱ्या आशा स्वयंसेविकांचा गौरवपत्र देवुन सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक गुहागर तालुकयातील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाटपन्हाळे गावातील सौ. साक्षी संदिप भेकरे यांना व व्दितीय प्राथमिक आरोग्य केंद्र हातखंबा सौ. निकिता कदम या आशा स्वयंसेविकेला पारितोषीक देण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यातील दोन आशा स्वयंसेविका प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील एक आशा स्वंयसेविका व जिल्हास्तरीय दोन नाविण्यपुर्ण पुरस्कार व सर्वोत्कृष्ट तीन गटप्रवर्तक पुरस्कार वितरीत करण्यात आले. याप्रकारे जिल्हयातील एकुण 92 आशा स्वयंसेविका यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदरच्या कार्यक्रामाचे सुत्रसंचालन आरोग्य विभागाचे कक्ष अधिकारी श्री. वामन कदम यांनी केले. प्रस्ताविकाचे वेळी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आशा स्वयंसेविका योजनेबाबत थोडक्यात माहिती सांगितली. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आशा स्वयंसेविका यांनी यापेक्षा अधिक चांगले काम करावे असे सर्वांना सुचना केल्या. कोरोना कालावधी मधील आपले काम खुपच महत्वाचे आहे आपल्या या कामामुळे आपण कोरोना मुक्त होत आहोत.