मलकापूर : सध्याच्या काळामध्ये वाढदिवस म्हटल्यानंतर विविध खर्च करत धुमधडाक्यात आपला व लेकरांचा वाढदिवस साजरा करतात परंतु मलकापूर तालुक्यातील अमरकुमार तायडे हे दरवर्षी स्वतःचा वाढदिवस काही मुकबधीर विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन साजरा करतात.
मुकबधीर अनाथाश्रमातील किंवा अपंग, मुलांना मदत करणाऱ्या जिवंत हृदयी माणसांपैकी एक म्हणजे अमरकुमार आनंद तायडे आहेत. ते दरवर्षी अशा मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा करून मुलाना भेटवस्तू वितरित करून भोजनदान अल्पउपहार,फळ, गणवेश वाटप करत असतात. त्यांच्या या उदात्त कार्यामुळे त्यांची सर्वसामान्य माणसातील असामान्य माणूस म्हणून सर्वत्र त्यांनी ख्याती आहे. मूळ मलकापूरचे रहिवासी असलले अमरकुमार तायडे केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्लीचे मुबंई महाराष्ट्र विभागीय सचिव आहेत. काल दि २९/०३/२०२२ मंगळवार आपल्या वाढदिवसानिमित्ताने मुखबधीर मुलाच्या वसतिगृहात वाढदिवस साजरा करत तरुणांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. मुखबधीर मुलांसोबत केक कापून अल्पहारचा आस्वाद घेत वाढदिवस साजरा केला एवढेच नाही तर विशेषत: त्यांनी आपल्या नव नवीन उपाय योजनेतून यावेळी मुलांना वह्या, पेन-पुस्तक वाटप केले.
कार्यक्रमावेळी तायडे म्हणाले की, दरवर्षी वाढदिवस धुमधडाक्यात साजरा न करता वेगवेगळे उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करत असतो. अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरील उत्साह याच माझ्यासाठी शुभेच्छा असतात. कोवळ्या हातात अक्षरांचे दीप ठेवायला हवे,रुजायला हवेत, असेहि यावेळी ते म्हणाले.
अमर कुमार तायडे यांच्या समाजसेवेच्या कार्याचे देश पातळीवर अनेक राष्ट्रीय व राज्य स्तरावर कौतुक केले जात आहे. त्यांचे सामाजिक कार्य भावी युवापिढीसाठी प्रेरणा देणारे आहे.
माणसाला माणुसकी शिकवणारा माणूस…
या उपक्रमावेळी सिद्धांत इंगळे यांनी अमरकुमार तायडेंना वाढदिवसाच्या सुभेचा दिल्या. त्यानंतर ते म्हणाले, जमिनीशी जोडलेली माणुसकी आणि त्याही माणसाला माणुसकी शिकवणारा माणूस म्हणजे अमरकुमार तायडे. असे बोलून त्यांचे तोंडभरून कौतुक केले. सिद्धांत इंगळे, अक्षय तायडे, कारण झनके, गणेश खर्चे आदीनीं हा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला.