शिवसेना काँग्रेस आमदाराच्या नाराजीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले….
मुंबई: राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आले आहे. या सरकारने अडीच वर्षांचा कालावधी सुद्धा पार केला आहे. मात्र यामध्ये नेहमची काही ना काही सुरु असते. आताच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले आहे. यामध्ये शिवसेना आमदार यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचे बोलून दाखले आहे. तर आज पुन्हा एकदा काँग्रेस आमदार यांनी सुद्धा महाविकास आघाडी सरकारवर आपण नाराज असल्याचे म्हटले आहे. परंतू यामधील जेष्ठ नेते नेहमीच सांगत असतात की सर्व काही अलबेल आहे, परंतू आता पुन्हा एकदा मविआ सरकार मधला वाद चवाट्यावर आला आहे. यावर आता भाजप नेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शिवसेनेमध्ये 90 टक्के खासदार आणि 75 टक्के आमदार नाराज आहेत. बजेटच्या माध्यमातून विचार केला तर, मंत्री आणि त्यांच्या जवळचे आमदार यांच्यासाठी बजेट तयार करण्यात आलाय. शिवाय पैशामधून कमिशन मिळेल, अशा ठिकाणी बजेट आहे. बजेट हे दुराग्रही भावनेनं तयार करण्यात आलंय. बाकी आमदारांना काहीच मिळालं नाही. त्यामुळं त्यांच्या मतदारसंघाचा विकास होणार नाही. स्थानिक पातळीवर शिवसेना आणि काँग्रेस तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या कार्यकर्त्यांत वाद होणार आहे. त्यांच्यात लढाई सुरू आहे. जसजसे दिवस पुढं जातील, तसतसे असुरक्षित वातावरण तयार होत आहे. राज्यात राजकीय असुरक्षितता तयार झाली आहे.
पुढे बोलताना म्हणाले, मतदारसंघात विकासकामे झाली नाहीत. त्यामुळं काँग्रेस आणि शिवसेनेच्या पातळीवर आमदार नाराज आहेत. राष्ट्रवादी मात्र खूश आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. शिवसेना आणि काँग्रेसमधील आमदार नाराज ठेवायचं. राष्ट्रवादीचे आमदार स्वयंपूर्ण करायचं. मी राष्ट्रवादीत आहे. मला किती पैसे मिळाले बघ. तुला तुझ्या मतदारसंघासाठी किती पैसे मिळाले. यावरून वाद निर्माण करायचा. एकंदरित शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांना अस्वस्थ करून राष्ट्रवादीला वाढवायंच. असा ही त्यांनी आरोप यावेळी केला आहे.