इचलकरंजी- लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचे सर्व क्षेत्रातील कार्य अतिशय कौतुकास्पद असून त्यामुळे “लायन्स गौरव पुरस्कार” हा शहर व परिसरामध्ये एक प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. असे गौरवोद्गार आमदार श्री प्रकाश आवाडे (आण्णा) यांनी काढले. ते यावर्षीच्या लायन्स गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
यावर्षीचा लायन्स गौरव पुरस्कार सोहळा मा. नामदार श्री. राजेंद्रजी पाटील (यड्रावकर) व आमदार श्री प्रकाश आवाडे (आण्णा) यांच्या प्रमुख उपस्थितीत लायन्स ब्लड बँकेच्या प्रांगणात मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी शहर व परिसरात उल्लेखनीय कार्य केलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व संस्थांना प्रमुख अतिथी यांचे हस्ते लायन्स गौरव पुरस्कार देवून गौरविणेत आले.
कार्यक्रमाचा शुभारंभ क्लबचे खजिनदार महेंद्र बालर यांच्या ध्वजवंदन प्रतिज्ञेने झाला लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत भट्टड यांनी उपस्थितांचे स्वागत केले व आपल्या प्रास्ताविकातून लायन्स गौरव पुरस्कारासंबंधी व निवड प्रक्रिये विषयी आढावा घेतला. यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते श्री. निकुंज बगडिया (उद्योग व व्यापार क्षेत्र), श्री सुनिल महाजन (सामाजिक क्षेत्र), श्री. संजय कांबळे (उत्कृष्ट नगरसेवक), श्री श्री. गुंडाप्पा रोजे (चौगुले) मिल्क व मिल्क प्रॉडक्ट), सौ. वैभवी निंगुडगेकर (हॉटेल व्यवसाय ) श्री. दगडूलाल मर्दा चॅरिटेबल व रिसर्च फौंडेशन ( सामजिक संस्था) यांना लायन्स गौरव पुरस्कार प्रदान करणेत आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना सर्वच पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी क्लबला धन्यवाद देत या पुरस्काराने आमचा उत्साह आणखीन वाढला असून आपले कार्य अधिक चांगले करणेची प्रेरणा मिळाली आहे. अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या.
शेवटी लक्ष्मीकांत बांगड यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या विशेष कार्यक्रमासाठी माजी प्रांतपाल PMJF विजयकुमार राठी, MJF डॉ. विलास शहा, रिजन झोन चेअरमन महेश सारडा, ट्रेझरर महेंद्र बालर, सेक्रेटरी शैलेंद्र जैन, लेडीज विंग कॉर्डीनेटर सौ. कनकश्री भट्टड, कमिटी चेअरमन विनय महाजन व कमिटी सदस्य सुरज दुबे यांचेसह शहरातील अनेक मान्यवर मंडळी, अनेक संस्थांचे पदाधिकारी, निमंत्रित व लायन्सचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ. संगीता सारडा व लिंगराज कित्तुरे यांनी केले.
Posted inकोल्हापूर
लायन्स गौरव पुरस्कार” वितरण सोहळा संपन्न
