आचार्यश्री आनंद ऋषिजी महाराज साहब यांच्या 30 व्या स्मृती दिनानिमित्त
आचार्यश्री आनंद युवा मंच आणि कॉन्फरन्स कडून विविध कार्यक्रम
इचलकरंजी/प्रतिनिधी –
सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर व अग्रभागी असलेल्या आचार्यश्री आनंद युवा मंचच्यावतीने सलग 278 दिवसांपासून आनंद गुरु मोफत चपाती भाजी सेवा केंद्र अविरतपणे सुरु आहे. औचित्य साधत आचार्यश्री आनंदऋषिजी महाराज यांच्या 30 व्या स्मृती दिनानिमित्त मिष्ठान्नाचे वाटप करण्यात आले चपाती-भाजीसोबतच मिष्ठान्न वाटप करण्यात आले. त्याचबरोबर उन्हाळ्याची तीव्रता व नागरिकांची गरज ओळखून याचठिकाणी पाणपोईचा शुभारंभही करण्यात आला.
येथील मध्यवर्ती बसस्थानकासह कामानिमित्त येणार्या गोरगरीब गरजूंना अन्न मिळावे या उद्देशाने आचार्यश्री आनंद युवा मंचच्यावतीने 24 जून 2021 पासून आनंद गुरु मोफत चपाती भाजी केंद्र सुरु करण्यात आले आहे. शहरातील दानशूर व्यक्ती, संस्था आदींच्या सहकार्यातून व मंचचे पदाधिकारी व सदस्यांच्या माध्यमातून हे केंद्र सुरु आहे. .त्याचसोबत वाढत्या उन्हाळ्यामुळे पाण्याची गरज ओळखून केंद्रालगतच ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स दिल्ली युवा कोल्हापूर आणि आचार्यश्री आनंद युवा मंचच यांच्यावतीने पाणपोई सुरु करण्यात आली आहे.
तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन घेण्यात आलेल्या धार्मिक प्रश्नमंजुषा स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला.याचे मुख्य संचलन विलास गांधी,राजेंद्री बोरा, अनिलजी गांधी, अक्षय गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या स्पर्धेसाठी 1197 अशा मोठ्य संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी 25 बोल 25 सवाल आणि आचार्यश्री का जीवन 5 सवाल असे विषय देण्यात आले होते. त्यामध्ये सौ. सपना दीपक बेदमुथा (इचलकरंजी) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर सौ. सुनिता संजयकुमार बाफना (इचलकरंजी) यांनी द्वितीय तर पुजा खिवनसारा (सिन्नर) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेत 101 जणांना बक्षिस देण्यात आली
मंचच्यावतीने सलग नऊ महिन्यांपासून अखंडीतपणे हे अन्नदानाचे कार्य सुरु आहे. जवळपास 200 लोकांना याचा लाभ मिळत आहे. एक दिवसाचा खर्च 3100 रुपये इतका आहे. ज्यांना कोणाला यामध्ये सहकार्य द्यायचे आहे, त्यांनी या केंद्राला भेट देऊन माहिती घ्यावी अथवा 9822055664 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंचच्यावतीने कॉन्फरन्सचे राष्ट्रीय युवा मंत्री मंडळ चे प्रितम बोरा यांनी केले.
याप्रसंगी श्रीकांत चंगेडीया, पद्मचंद खाबिया, जीवन पुनमिया, उगमचंद गांधी, महावीर बोरुंदिया, गुलाब कोठारी, प्रकाश बोरा, राजकुमार नहार, विलास गांधी, अनिल गांधी,जयंती सालेचा, जितू पारख, ग्यानजी जैन, जतन मेहता, अभय बाबेल आणि एसवायजेसी चे नवनिर्वाचित अध्यक्ष महावीर गांधी आणि आचार्यश्री आनंद युवा मंचचे सर्व सदस्य उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
आचार्यश्री आनंद ऋषिजी महाराज साहब यांच्या 30 व्या स्मृती दिनानिमित्तआचार्यश्री आनंद युवा मंच आणि कॉन्फरन्स कडून विविध कार्यक्रम
