सफाई कामगारांच्या कामासाठी मुख्याधिकाऱ्यांच्या हाताला लकवा
➖ रवि रजपुते
इचलकरंजी : नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना स्वतःची कायमची घरे देणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना आहे त्याअंतर्गत येथील नगरपालिकेने सफाई कर्मचाऱ्यांना घरे बांधून देण्यासाठी जागा देण्याचा ठराव केला. त्यावर हरकती सुचना घेतल्या. यानंतर हा ठराव अंतीम मंजूरीसाठी शासनाकडे पाठवण्याच्या दृष्टीने ठराव करणे आवशक आहे. पण प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल हे म्हणतात की प्रशासकीय काळत मला३७/खाली जागेचा फेरफार करण्याचा ठराव करता येत नाहीआमच्या निवेदनाला उत्तर देताना असे सांगतात व दुसरीकडे मात्र प्रशासकीय काळत ३१/१/२०२२. मुख्यधिकारांची ३७/खाली जागा फेरफारचा ठराव व आर्थिक विषय माक्ततेदारांची लाखो रुपयांची डिपॉझिट परत दिली आहे अश्याप्रकारे कामगारांच्या हक्काच्या घराचा ठराव करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी टाळत आहेत. प्रशासकीय काळात ४५ ठराव करणाऱ्या मुख्याधिकार्यांना मात्र कामगारांच्या न्याय हक्काचा ठराव करायला त्यांच्या हाताला लकवा मारला आहे नगरपालिकेची माक्ततेदारांची बिले भेटलेकी दिली जातात माक्ततेदाराना भेटायला वेळ घेण्याची आवश्यकता नाही परंतु कामगारांच्या प्रश्नासाठी कामगार पुढारी याना भेटण्यासाठी वेळ घेतल्या शिवाय भेटण्याचे बेकायदेशीर व स्वयंघोषित आदेश आहेत
एकंदर त्यांचे सगळे धोरण सफाई कामगार विरोधी असल्याचा आरोप मा. उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी केला ते म्हणाले इचलकरंजी नगरपालीकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेतंर्गत शहापूर भागातल्या दोन जागा देण्याचा ठराव मंजूर केला त्या जागांचा वापराचा हेतू बदलण्याच्या या ठरावावर हरकती सुचना घेण्यात आल्या. त्यानंतर याबाबतच्या ठरावाला अंतिम प्रशासकीय मंजुरी शासनाकडून घ्यावी लागणार आहे तसा पालिकेने ठराव करणे गरजेचे आहे असे स्पष्ट करून रवी रजपूते म्हणाले पालिकेच्या बॉडी ची मुदत संपली आणि शासनाला जो ठराव पाठवायचा तो प्रलंबित राहिला या योजनेसाठी फेरबदल चा ठराव पाठवल्या शिवाय या महत्त्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप येणार नाही म्हणून सर्व पक्षीयांचे नगरसेवकांनी मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी यांची भेट घेतली शिवाय वस्तुस्थिती कथन केली मात्र यांची मानसिकता सफाई कामगारांच्या न्याय विरोधी असल्याचे स्पष्ट झाले असे रजपूते यांनी सांगितले
ते म्हणाले प्रशासकीय काळात 45 ठराव करणाऱ्या मुख्याधिकारी यांना मात्र पालिका सफाई कामगारांच्या हक्काच्या ठरावाला न्याय देताना त्यांचा हात आखडतो आहे हा आजवरचा त्यांचा वाईट अनुभव सफाई कामगारांना आला आहे त्यामुळे त्यांची कामाची पद्धत एकंदर कामगार विरोधी असल्याचा आरोपही रजपूते यांनी केला
या शिष्टमंडळात मध्ये उपनगराध्यक्ष तानाजी पोवार ,सागर चाळके, विठ्ठल चोपडे ,प्रकाश मोरबाळे ,किसन शिंदे ,जहांगीर पट्टेकरी ,बंडा मुसळे ,रणजीत अनुसे, प्रधान माळी, यांचा प्रमुख समावेश होता
Posted inकोल्हापूर
सफाई कामगारांच्या कामासाठी मुख्याधिकाऱ्यांच्या हाताला लकवा➖ रवि रजपुते
