लिंगायतांना स्वतंत्र धर्म मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा मिळावा – मा.खा.धैर्यशील माने

मजरेवाडी प्रतिनिधी/ रमेशकुमार मिठारे
शुक्रवार दिनांक १ एप्रिल रोजी लोकसभेत हातकणंगले मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने, दादा यांनी लिंगायत धर्मास स्वतंत्र संविधनिक धर्म मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा मिळावा म्हणून मागणी केली.
संपूर्ण देश तसेच दक्षिण भारता मध्ये लिंगायत बांधव मोठ्या प्रमाणात असून त्यांचे सामाजिक कार्य मोठे आहे.
अशा या लिंगायत धर्माची स्थापना म.बसवेश्वर यांनी ई. स.बाराव्या शतकात करून अनुभव मंटप नावाची सर्व जाती,धर्माची लोकसंसद चालविली.
इंग्रज काळात सन 1941 पर्यंत या धर्माला अल्पसंख्य दर्जा होता.परंतु नंतर तो काढला. आता नव्याने ही मागणी पूर्ण व्हावी अशी या समाजाची बऱ्याच वर्षाची न्यायिक मागणी असून ती केंद्र व राज्य सरकारे यांनी पूर्ण करण्यासाठी योग्य कार्यवाही करावी.
असे सांगून त्यांनी संपूर्ण देश व सभागृहाचे लक्ष या समस्येकडे वेधले.त्याबद्दल लिंगायत संघर्ष समिती, लिंगायत समन्वय समिती, राष्ट्रीय बसव दल, विविध लिंगायत धर्मीय संघटनेकडून व समस्त समाजाकडून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे