क्रिडाई आयोजित “दालन २०२२” च्या वातानुकुलित डोम उभारणीस प्रारंभ .. शाहूपुरी जिमखाना मैदानावर ८ ते ११ दरम्यान भव्य आयोजन
कोल्हापूर : बांधकाम क्षेत्रातील सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा आणि घटकांची एकत्रित माहीती देणाऱ्या क्रिडाई-कोल्हापूर आयोजित “दालन २०२२” प्रदर्शनाच्या वातानुकुलित डोम उभारणीस प्रारंभ झाला. शाहूपुरी जिमखाना मैदानावर येत्या ८ ते ११ एप्रिल, दरम्यान संपन्न होणाऱ्या या प्रदर्शनाचे आयोजन क्रिडाई कोल्हापूरने भव्य प्रमाणात दोन वर्षाच्या कालावधीनंतर केलेले आहे. .
क्रिडाई सचिव प्रदिप भारमल यांनी यावेळी बोलताना सांगितले की तब्बल दोन वर्ष अवघे समाज जीवन ठप्प झाल्याच्या पार्श्वभुमीवर नव्याने उभारी घेत आता सर्वत्र गतिमानता येत आहे. या पार्श्वभूमीवर मनामनातील घराचा शोध या क्रिडाई आयोजित दालन २०२२ प्रदर्शनातून नक्कीच पूर्ण होणार आहे. असे नमूद केले आहे. तर क्रिडाई उपाध्यक्ष-दालन अध्यक्ष, प्रकाश देवलापूरकर, यांनी वाढत्या उन्हाळ्यात प्रथमच या अधुनिक पध्दतीच्या वातानुकुलित डोम उभारणीच्या दालन प्रदर्शनातून भेट देणाऱ्या प्रत्येकास सुखद गारव्यासह मनातील घर शोधता येणार आहे.
यावेळी क्रिडाई अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, क्रिडाई उपाध्यक्ष-दालन अध्यक्ष, प्रकाश देवलापूरकर, क्रिडाई उपाध्यक्ष चेतन वसा, यांच्यासह क्रिडाई खाजानिस गौतम परमार, दालन उपाध्यक्ष अजय डोईजड, दालन सचिव सोमराज देशमुख, दालन खजिनदार संदीप मिरजकर, श्रीधर कुलकर्णी, निखिल शहा, पवन जामदार, स्टॉल समिती प्रमुख संदीप पवार, जनसंपर्क समिती प्रमुख विक्रांत जाधव, आदरातित्थ समिती प्रमुख संग्राम दळवी सह संग्राम पाटील, रवी माने, गंधार डिग्रजकर आदी विविध समिती प्रमुखांसह पदाधिकारी उपस्थित होते.
.
या दालन २०२२ चे मुख्य प्लॅटिनम स्पॉन्सर महालक्ष्मी टीएमटी बार असून कजारिया टाईल्स गोल्ड स्पॉन्सरर आहेत. त्याचबरोबर एच.डी.एफ.सी. होम लोन्स, आय.सी.आय.सी.आय बँक होम लोन्स, सिपलो सिरॅमिक्स, जॉन्सन लिफ्टस्, शिंडलर लिफ्टस् हे सिल्वर स्पॉन्सरर आहेत. या व्यतिरिक्त यश पॉली, पारस डोअर्स, इंडो कन्स्ट्रक्शन, बिर्ला एच.आय.एल.पाईप्स, देवजी इंडस्ट्रिज, स्टारटेक, विलो, डिमार्क, रॉयल रिचर्डस्, रंगाटी ॲल्युमिनियम, गोदावरी पेन्टस्, इंडुरा, देवराज ट्रेडर्स, मॅपी,
अल्टिमा, के.इ.आय. वायर्स ॲन्ड केबल्स, बाथ सेन्स आदी सहप्रयोजक असून आय.डी.पी.आय. बँक, एल.आय.सी. हौसिंग फायनान्स, कॅनरा बँक, ॲक्सिस बँक, दि. विश्वेश्वर सहकारी बँक, विरशैव को-ऑप बँक आणि अन्वित या वित्तीय संस्थांचा सहभाग असून त्या इच्छुक ग्राहकांना कमीत कमी कागदपत्रात अर्थसहाय्य उपलब्ध करून देणार आहे. शाहुपूरी जिमखाना मैदानावर तीन भव्य वातातुकुलित दालनामध्ये या दालन २०२२ प्रदर्शनाचे उभारणी होत आहे. सहभागी सर्व सभासद
गृहनिर्माण संस्था, सह प्रायोजक सह सर्वांसाठीच या मैदानातूनच आयोजक क्रिडाईचे कार्यालयीन कामकाजही वातानुकुलित दालनात सुरू झाले आहे.
गेली दोन वर्ष ठप्प झालेल्या जनजीवन आता पूर्णत: खुले झाले आहे. सामान्य जनतेच्या मनातील वन बी-एच-के ते पेंट हाऊस, रो-बंगलो ते सेकंड होम पर्यंतच्या विविध प्रकारच्या दिग्गज संस्थांच्या गृहप्रकल्पाची प्रत्यक्ष माहिती दालन २०२२ मध्ये एकाच ठिकाणी मिळणार असल्याने सर्वांचाच बहुमुल्य वेळ वाचणार आहे. त्यासाठी सर्वांनी सहकुटुंब सह परिवार मध्यवर्ती बस स्थानका नजिकच्या शाहुपूरी जिमखाना मैदानावरील या दालन २०२२ ला अवश्य भेट द्यावी असे आवाहन संयोजक क्रिडाई कोल्हापूरने केले आहे.