हॉटेल व्यवसायाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कुचेकर मामा परिवाराचा सत्कार !
इचलकरंजी :
गेल्या ५० वर्षांपासून भजी आणि चहाची तीच चव चाखताना अत्यंत प्रामाणिकपणे हॉटेल व्यवसाय करणारे कुचेकर मामा यांचा सत्कार आज रवी रजपुते सोशल फाँडेशन तर्फे करण्यात आला या व्यवसायाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कुचेकर मामांसह त्यांच्या परिवाराचा सत्कार जेष्ठ नेते विलासराव गाताडे,युवा नेते अमित गाताडे यांच्या हस्ते झाला, मा, उपनगराध्यक्ष रवी रजपुते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते, ५० वर्षांपूर्वी जेव्हा भजी चहा हॉटेल व्यवसाय कुचेकर मामांनी सुरू केला,तेव्हा भजी २० पैसे, प्लेट तर १० पैसे चहा एक कप होता, मात्र प्रामाणिकपणे हा व्यवसाय केल्याने इंडस्ट्रीयल इस्टेट मध्ये कुचेकर मामांना हॉटेल साठी भागातील नागरिकांनी जागा दिली, मा उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनीच कुचेकर दाम्पत्याचा सत्कार आयोजला होता, यावेळी रोहन रोडे,युवराज केर्ले आणि सरदार मुजावर उपस्थित होते.