शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचे मनोज साळुंखे यांचे ध्येय
इचलकरंजी –
शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे ध्येय झटणारे माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांनी भारतीय जनता पार्टीच्या 42 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत प्रभाग 12 मधील नागरिकांसाठी इ श्रम कार्ड, लहान मुलांचे आधारकार्ड, आधारकार्डला मोबाईल लिंक आदीचे मोफत शिबीर घेतले. या शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सन 1980 मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. आज सगळीकडे भाजपाचा प्रभाव असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना सुरु केल्या. त्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला. अशा भारतीय जनता पार्टीचा 42 वा वर्धापन दिन मनोज साळुंखे यांनी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे साजरा केला. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ भागातील प्रत्येक नागरिकांना मिळावा यासाठी भागातील मनोज साळुंखे हे सातत्याने प्रयत्नशील असतात. वर्धापन दिनानिमित्त इ श्रम कार्ड, 0 ते 5 वयोगटातील लहान मुलांचे नवीन आधार कार्ड काढणे तसेच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे या संदर्भात मोफत शिबिराचे आयोजन केले होते. त्या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून इ श्रम कार्डसाठी आजवर साडेतीनशेपेक्षा अधिक जणांनी नोंदणी केली असून बहुतांशी जणांना कार्ड देण्यात आले आहे.
यावेळी माजी नगरसेवक मनोज साळुंखे, भाजपा शहर अध्यक्ष अनिल डाळ्या, साळी समाज अध्यक्ष प्रशांत पांढरपट्टे, उद्योजक बाळासाहेब बेलेकर, तरू कमिटी सदस्य सतीश भस्मे, शशिकांत मोहिते, सौ नागुबाई लोंढे, शेखर भंडारे, लालचंद पारिक, अर्जुन शिंदे, यासीन शेख, सौ विद्या सुतार, सौ वैशाली गायकवाड,सौ प्रिया बागडे, अनिकेत सुतार, धनंजय दाहोत्रे आदींसह भागातील महिला व नागरिक उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचे मनोज साळुंखे यांचे ध्येय
