इचलकरंजी –
शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथील समतानगर गल्ली नं. 3 मध्ये सांडपाण्याच्या निचर्यासाठी गटार बांधावी म्हणून मागील 23 वर्षापासून पाठपुरावा करुनही प्रशासनाकडून दुर्लक्षच केले जात आहे. या संदर्भात मिरासाब चाँदसाब दानवाडे यांनी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्याकडे निवदेनाद्वारे हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
निवेदनात, मिरासाब दानवाडे हे समतानगर गल्ली नं. 3 मध्ये सन 1998 पासून वास्तव्यास आहेत. याच परिसरात अन्य काही कुटुंबे राहण्यास आहे. मात्र या सर्वांच्या घरातून बाहेर पडणार्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी या भागात गटारच नाही. त्यामुळे घरालगतच पाणी साचून दुर्गंधी निर्माण होण्यासह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढून साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भागात सांडपाण्याचा योग्य तो निचरा होण्यासाठी गटार बांधून द्यावी म्हणून ग्रामपंचायतीसह संबंधित अधिकार्यांकडे लेखी व तोंडी निवेदनाद्वारे सातत्याने मागणी केली आहे. मात्र मागील 23 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असून याठिकाणी गटार का बांधली जात नाही हे न उलगडणारे कोडे आहे. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना ये-जा करतानाही अडचणी येतात. आता दोन महिन्यानंतर पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी हा प्रश्न मार्गी लावून नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होत असलेला धोका दूर करावा अशी मागणी दानवाडे यांनी केली आहे.
Posted inकोल्हापूर
अब्दुललाट समतानगर गटार नसल्याने सांडपाण्याची दुर्गंधी ; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर प्रांताना निवेदन
