इचलकरंजी –
येथील शरीरसौष्ठवपटू आणि जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा खेळाडू अजिंक्य रेडेकर यांनी विचुंबे पनवेल येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रथम क्रमांकासह महाराष्ट्र श्री किताब बहुमान मिळविला. या यशाबद्दल आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते अजिंक्य रेडेकर यांचा शाल, श्रीफळ, फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
इचलकरंजीतील शरीरसौष्ठवपटू अजिंक्य रेडेकर यांनी आजवर अनेक स्पर्धांमध्ये यशोशिखरे पार केली आहेत. विचुंबे येथील राज्य अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी 85 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला. त्याचबरोबर महाराष्ट्र श्री चा किताब पटकविला. या यशामुळे अजिंक्य रेडेकर यांची पुणे येथे आयोजित मिस्टर युनिव्हर्स या जागतिक स्पर्धेत भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. या यशाबद्दल आमदार आवाडे यांनी रेडेकर यांचा सत्कार करुन पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बाळासाहेब कलागते, संजय जगताप, धनंजय आरेकर, बंडु जोंग, दत्ता शेळके, किरण लंगोटे, किशोर निंबाळकर, अक्षय माने उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
अजिंक्य रेडेकर शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रथम क्रमांकासह महाराष्ट्र श्री किताब बहुमान
