गुडाळेश्वर विकास सोसायटी चेअरमन पदी श्री इंद्रजीत आनंदराव पाटील तर व्हा चेअरमन पदी श्री अरुण अशोक पाटील यांची बिनविरोध निवड….
गुडाळ/ वार्ताहार संभाजी कांबळे

गुडाळ तालुका राधानगरी येथील श्रीगुडाळेश्वर विकास सोसायटी ची निवडणुकीत.गुडाळेश्वर शेतकरी विकास आघाडी ला 12 पैकी 12 जागा जिंकून या आघाडीने या संस्थेत विजयाची परंपरा कायम राखली आहे. या आघाडीचे प्रमुख भोगावती सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक ए डी पाटील मा भोगावती सहकारी साखर कारखाना संचालक तंटामुक्तअध्यक्ष महादेवराव कोथळकर व माजी भोगावती सहकारी साखर कारखाना माजी संचालक व्ही डी पाटील व श्रीपती बाबुराव कांबळे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली या संस्थेत वर्चस्व कायम राखले आहे.
प्रसंगी चेअरमन इंद्रजीत पाटील आपल्या भाषणामध्ये म्हणाले की (सभासदांचे हित सभासदा बद्दल एक ही तक्रार येणार नाही व संस्थेचा पारदर्शक कारभार केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही किंबहुना ही संस्था कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अग्रेसर असेल एवढेच मी वचन देतो असे ते आपल्या सत्कारप्रसंगी मनोगत व्यक्त केले..)
यावेळी नूतन, संचालक आनंदा गणपती माळवी ,डॉ आनंदराव बाबुराव माळवी ,आशिष लक्ष्मण पाटील ,लक्ष्मण नागू पाटील शिवाजी महादेव पाटील, भिकाजी दत्तू पाटील ,मनीषा दत्तात्रय पाटील मालती पांडुरंग पाटील, संजय श्रीपती कांबळे, सागर शंकर कदम व तसेच संस्थेचे ज्येष्ठ सभासद वाय डी पाटील, वाय जी पाटील ,ईश्वरा पाटील, ईश्वरा पाटील (तात्या) नवाळे उपस्थित होते .ही निवड राधानगरी सहाय्यक निबंधक श्री यु ए शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली .यावेळी संस्थेचे कर्मचारी मा उपसरपंच आर के पाटील. दत्तात्रय पाटील. विठ्ठल पाटील .विठ्ठल माळवी कर्मचारी व सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते… कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे सचिव दिलीप काशीम गोरे. यांनी केले तर आभार आशिष पाटील यांनी मांडले.