महाराष्ट्र कोष्टी समाज मंडळाकडून आर्थिक सहाय्य प्रदान
इचलकरंजी/प्रतिनिधी –
महाराष्ट्र कोष्टी समाज मंडळ मुंबई या संस्थेची सभा इचलकरंजी येथील श्री चौडेश्वरी देवांग मंदिर येथे राज्याचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी राज्यातील विविध संस्था, संघटना व विद्यार्थी यांना शैक्षणिक आर्थिक मदत प्रकाशराव कांबळे, अंकुशराव उकारडे, अरविंद तापोळे यांचे हस्ते व विठ्ठलराव डाके, विश्वनाथ मुसळे, उत्तम म्हेत्रे, बाबुराव म्हेत्रे यांचे प्रमुख उपस्थितीत देण्यात आली.
यावेळी विठ्ठलराव डाके, बाबुराव म्हेत्रे, सौ. रत्नप्रभा भागवत, उदय बुगड यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र कोष्टी समाज मंडळातर्फे चौंडेश्वरी युवा फौंडेशन यांना मेडिकल साधने घेण्यासाठी 25 हजार, देवांग मंदिर दिपोत्सव 15 हजार, चौंडेश्वरी मंदिर बार्शी 11 हजार, चौंडेश्वरी मंदिर सांगोला 11 हजार, देवांग समाज पुणे 10 हजार आणि कु. रसिका दत्ताराम म्हेत्रे हिला शैक्षणिक कर्जापोटी 1 लाख असे अंदाजे दोन लाख रूपयांच्या आर्थिक मदतीचे धनादेश संबंधितांना देण्यात आले.
या मदतीबद्दल युवा मंडळाच्यावतीने प्रशांत सपाटे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी महासचिव रामचंद्र निमणकर, राजेंद्र ढवळे, सचिव मिलींद कांबळे, प्रमोद मुसळे, उदय बुगड, संदिप हावळ, शितल सातपुते, श्रीनिवास फाटक, दिलीप भंडारे, सौ. प्राजक्ता होगाडे, सौ. सुधा ढवळे, सौ. अर्चना सातपुते, सौ. स्मिता सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी मिलींद कांबळे यांनी आभार मानले.
Posted inकोल्हापूर
महाराष्ट्र कोष्टी समाज मंडळाकडून आर्थिक सहाय्य
