इचलकरंजी अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी मेहबूब बाणदार तर उपाध्यक्षपदी अमित सिंग यांची बिनविरोध निवड

इचलकरंजी अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी मेहबूब बाणदार तर उपाध्यक्षपदी अमित सिंग यांची बिनविरोध निवड

इचलकरंजी अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी मेहबूब बाणदार तर उपाध्यक्षपदी अमित सिंग यांची बिनविरोध निवड
कबनूर -(प्रतिनिधी चंदुलाल फकीर) इचलकरंजी येथील अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनच्या सन २०२२-२०२४ सालसाठी बिनविरोध निवडी पार पडल्या. त्यामध्ये असोसिएशनच्या अध्यक्षपदी  ॲड.मेहबूब बाणदार यांची तर उपाध्यक्षपदी ॲड.अमित सिंग यांची निवड करण्यात आली.त्याचबरोबर सेक्रेटरी पदी ॲड. सदाशिव आरेकर,जॉईट सेक्रेटरी पदी ॲड. समीर पाटील यांची निवड करण्यात आली.
सन २००५ साली इचलकरंजी येथे जिल्हा व सत्र न्यायालयाची  स्थापना करण्यात आली. त्यानंतर इचलकरंजी येथील अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशन स्थापण्यात आले. या असोसिएशनच्या  सन २०२२-२०२४ या दोन वर्षाच्या कालावधीसाठी पदाधिकाऱ्यांच्या निवडीची नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये सर्वांनुमते वरील प्रमाणे निवडी करण्यात आल्या.तर कार्यकारणीमध्ये कार्यकारणी प्रमुख म्हणून ॲड.शहनवाज पटेल आणि सदस्य म्हणून ॲड.किरण हुपरे,ॲड.राहुल समानगडकर,  ॲड.अमर हारगे, ॲड. सुशांत माने,ॲड.प्रवीण उपाध्ये यांचा समावेश आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्रे ज्येष्ठ सदस्य सिनियर ॲड.एम.डी.जमादार संस्थापक अध्यक्ष ॲड.विश्वास चुडमुंगे,अतिरिक्त जिल्हा बारचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष ॲड.ए.टी.तांबे, ॲड.डी.डी. पाटील,ॲड.संजय गजबी,ॲड.तोष्णीवाल,ॲड. सूर्यवंशी यांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. समीर कुलकर्णी,उपाध्यक्ष ॲड.विवेक तांबे,सेक्रेटरी ॲड.विशाल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.तर इचलकंजी बार असोसिएशन व अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनचे सदस्य ॲड.नितीन लड्डा,ॲड. अल्ताफ मुजावर,ॲड.शिवराज चुडमुंगे,ॲड.इरफान जमादार,ॲड.खानविलकर,ॲड.अतुल रेंदाळे,ॲड. निलेश लकडे,ॲड.पंकज पाटील,ॲड.डी.एम.लटके, ॲड.एम.यु.जमखंडी,ॲड.जी.के.सावंत ॲड.विभुते, ॲड.कणसे, ॲड.श्रीकांत शिंदे यांचेसह सदस्य उपस्थित होते. इचलकरंजी अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनच्या माध्यमातून इचलकरंजीतील न्यायसंकुलाच्या प्रश्नाचा पाठपुरावा करून तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. तसेच खंडपीठ प्रश्नातही सहभाग असेल त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमासह नवोदित वकिलांसाठी वर्कशॉप घेण्यात येणार असल्याचे नुतन अध्यक्ष ॲड. मेहबूब बाणदार यांनी सांगितले. यावेळी ॲड.अमित सिंग ॲड. दिग्विजय पाटील उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *