खातखेडा जिल्हा परिषद शाळेत महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले
नंददत डेकाटे //नागपूर जिल्हा प्रतिनिधी
भिवापूर (१२ एप्रिल २०२२ मंगळवार)
नागपूर : जि.प.प्रा.शा. खातखेडा केंद्र, महालगाव पं.स.भिवापूर येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले यांची जयंतीनिमित्त सोमवारी ११ एप्रिल रोजी अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या चंद्रकांत शेगोकर यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. तर, सहशिक्षक राजू लहुजी नवनागे, सुमन विनायकराव गायकवाड (अंगणवाडी सेविका) आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
संध्या शेगोकर (मु.अ ) यांनी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले जन्माला आले नसते तर, आज स्त्रिया या फक्त घरातच चूल आणि मुल सांभाळत बसल्या असत्या. महात्मा फुले यांचे कार्य महान आहे. त्यांनी मुलींची शाळा उघडली नसती तर, मी आज शिक्षिकाही झाले नसते, ही खंत त्यांनी प्रखरपणे मांडली. शेतकऱ्यांना त्यांनी ‘शेतकऱ्यांचा आसुड’ या पुस्तकातून शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या प्रभावीपणे मांडल्या. तसेच त्यांचे कार्य अतुलनीय आहे, अशी प्रतिक्रिया मांडली.
सहशिक्षक राजू लहुजी नवनागे यांनी मार्गदर्शन करतांना राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी पहिली मुलींची शाळा भिडे वाड्यात पुणे येथे स्थापन करून स्त्री जीवनात महिलांना शिक्षणाची नवक्रांती घडवून प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबीई फुले, फातिमा शेख, मुक्ताई साळवे यांना घडविले. त्यांना त्याकाळी शिक्षणापासून दूर ठेवण्यात येत होते. स्त्रियांचा मुक्तीदाता महात्मा ज्योतिबा फुले यांना कोटी-कोटी विनम्रता पूर्वक अभिवादन करून विद्यार्थिनींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून उच्चशिक्षित, उच्चविद्याविभूषित करू. व ही ज्ञानगंगा शेवटच्या टोकापर्यंत चांद्यापासून तर बांद्यापर्यत पोहचविण्यासाठी प्रयत्नरत राहू, असा संकल्प मार्गदर्शपर भाषणातून व्यक्त केला.