डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वधर्मीय जयंती समिती तर्फे विविध उपक्रमाने साजरी
कोल्हापूर,दि.१४ (प्रतिनिधी) बिंदू चौक येथे सर्वधर्मीय जयंती समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास एमआयडीसीचे अभियंता इराप्पा नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
राजर्षी शाहू गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीष कांबळे यांच्या हस्ते भोजन वाटप करण्यात आले.
यावेळी निवृत्त पोलिस उपअधीक्षक आर आर पाटील, को म न पा चे उपायुक्त रविकांत आडसुळ, अमोल कुरणे, अक्षय साळवे,निवास सूर्यवंशी, राज कुरणे,राष्ट्रीय खेळाडू प्राजक्ता सूर्यवंशी,गजानन कुरणे, अमोल इसापुरे,प्रशांत अवघडे,जहांगीर आत्तार, बाळासाहेब साळवी आदी उपस्थित होते.