इचलकरंजी/प्रतिनिधी –
बदलत्या काळानुरुप कुस्तीचे प्रशिक्षण घेत असलेल्या मल्लांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मैदान गाजविलेल्या ज्येष्ठ मल्लांच्या कुस्त्या पाहण्यासह त्यातून डावपेचाचे धडे शिकता आले पाहिजेत. आणि तीच गरज ओळखून व्यंकोबा मैदानातील प्रशिक्षित मल्लांसाठी संगणक देण्यात आला हे कौतुकास्पद आहे. त्याचा मल्लांनी वापर करुन इचलकरंजीचा कुस्तीतील नांवलौकिक आणखीन उंचवावा, असे आवाहन सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले.
श्री. बापू बाळा मोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने व्यंकोबा मैदान येथील मल्लांना संगणकाचे प्रशिक्षण घेता यावे, त्याचबरोबर विविध ठिकाणी भरणार्या कुस्ती मैदानातील मल्लांचे डावपेच अभ्यासता यावेत यासाठी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते संगणक प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री आवाडे बोलत होते. अध्यक्षस्थानी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे होते.
व्यंकोबा मैदानासह जुन्या आठवणींना उजाळा देत श्री. आवाडे यांनी, मागील दोन वर्षात कोरोना महामारीमुळे सर्व काही ठप्प झाले होते. पण आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून खंडीत झालेली इचलकरंजीतील कुस्ती मैदानाची परंपरा पूर्ववत व्हावी यासाठी लवकरच दिग्गज मल्लांचे जंगी कुस्त्यांचे मैदान भरविण्यात यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
स्वागत पै. अमृत भोसले यांनी तर प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे यांनी केले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष महेश सातपुते, दिलीप येटाळे, भगवान पाटील, शंकर येसाटे, प्रकाश स. मोरे, अजय जावळे, राजू बोंद्रे, रवि लोहार, नितेश पोवार, समीर शिरगांवे, प्रमोद पोवार, अनिल म्हालदार, संतोष उपरे, शेषराज गुरसाळे, अशोक केवले, नितीन पडीयार, बाळू शिंदे, अब्दुल किल्लेदार, पै. मोहन सादळे, बाळासो शिंदे, पै. बाळू शिंदे, बापू एकले, सुकुमार माळी, सुकुमार माळी, सतिश सुर्यवंशी, सुरज मगदूम, नंदू भोसले, योगेश तापेकर, मोरबाळे आदींसह मैदानातील मल्ल उपस्थित होते. आभार भारत बोंगार्डे यांनी मानले.
Posted inकोल्हापूर
बापू बाळा मोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने व्यंकोबा मैदान येथील मल्लांना संगणक प्रदान
