बांधकाम कामगार नोंदणी सुलभ करण्यासाठी बिल्डर असो.व क्रेडाई यांच्या वतीने मंत्री मुश्रीफ यांना निवेदन
इचलकरंजी/प्रतिनिधी -बांधकाम कामगारांची नोंदणी सुलभ होण्यासाठी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी व क्रेडाई, इचलकरंजी यांच्या वतीने राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले.
सध्या शासनाने बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी कंत्राटदारांची अथवा विकसक यांची शासकीय कार्यालयात नोंदणी असणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे अनेक सर्वसामान्य बांधकाम कामगाराना शासकीय लाभांपासून वंचित राहावे लागत असल्याचे आढळून आहे. यापूर्वी बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी अश्या प्रकारची कोणतीही अट शासन धोरणामध्ये नव्हती. परंतु आता कंत्राटदार व विकसक यांचा नोंदणी क्रमांक अनिवार्य केले असले कारणाने अनेक अडचणींचा सामना बांधकाम कामगारांना करावा लागत आहे. ज्या कंत्राटदारांची अथवा विकसक यांची शासकीय कार्यालयात नोंदणी नसेल तर त्यांच्याकडे काम करणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी नाकारण्यात येते व नोंदणी क्रमांकाची मागणी करण्यात येत आहे. तरी कंत्राटदार व विकसक यांच्या रेरा अथवा जीएसटी नंबर च्या आधारावर बांधकाम कामगारांची नोंदणी करून घेणेची विनंती यावेळी क्रेडाई व बिल्डर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने यावेळी ना. मुश्रीफ यांचेकडे केली. नामदार मुश्रीफ यांनी सदर विषयी शासनाच्या पॉलिसी मध्ये बदल करून कंत्राटदार व विकसक यांच्या रेरा अथवा जीएसटी नंबर च्या आधारावर बांधकाम कामगारांची नोंदणी करून घेणेचे निर्देश सहा. कामगार आयुक्त अनिल गुरव यांना दिले. त्याचबरोबर लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर चेअरमन नितीन धूत, क्रेडाई इचलकरंजी अध्यक्ष मयूर शहा, संजय रुग्गे, विकास चंगेडिया, अक्षय सातपुते, कुमार माळी, संदीप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.