आमची गझलसाद ‘ प्रकाशन व मुशायऱ्याचे आयोजन

आमची गझलसाद ‘ प्रकाशन व मुशायऱ्याचे आयोजन

आमची गझलसाद ‘ प्रकाशन व मुशायऱ्याचे आयोजन
——–—––—————————
कोल्हापूर ता. २३, मराठी गझल विद्यापिठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट यांचा नव्वदावा जन्मदिन व गझलसादचा पाचवा वर्धापनदिन यानिमित्ताने गझलसाद समूहाच्या वतीने ‘आमची गझलसाद ‘ या गझलसंग्रहाचे प्रकाशन आणि मुशायरा रविवार ता.२४ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता करवीर नगर वाचन मंदिराच्या सभागृहात आयोजित केला आहे.ज्येष्ठ गझलकारा प्रा.सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा ( मुंबई ) या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या आहेत. या गझलसंग्रहात डॉ. दयानंद काळे, डॉ. दिलीप कुलकर्णी, प्रा. नरहर कुलकर्णी, श्री. प्रसाद कुलकर्णी, श्री. श्रीराम पचिंद्रे, सौ. मनिषा रायजादे, सौ. सारीका पाटील, श्री. प्रविण पुजारी, डॉ. सुनंदा शेळके, श्री. अरूण सुनगर, डॉ. संजीवनी तोफखाने, श्री. अशोक वाडकर या गझलकारांच्या प्रत्येकी अकरा गझला आहेत.यावेळी मुशायराही होणार आहे.तरी या कार्यक्रमास साहित्य रसिक बंधू भगिनीनी यावे असे आवाहन गझलसादचे निमंत्रक प्रा.नरहर कुलकर्णी यांनी केले आहे.


——–—––—————————
.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *