गुड न्यूज: पाईपद्वारे गॅस प्रभाग क्र,12 मध्ये दीड महिन्यात मिळणार!
रवी रजपुते सोशल फौंडेशनच्या प्रयत्नाला यश.
इचलकरंजी:
येथील प्रभाग क्र,-12 भोनेमाळ,शाहूनगर,9 गल्या, कामगार चाळ, महात्मा गांधी हॉसिंग सोसायटी, सिद्धार्थ हॉसिंग सोसायटी,या भागात घरोघरी गॅस कनेक्शन सुविधा जोडल्या मुळे व त्या परिसरात गॅस लाईन टाकल्या मुळे घरात सुरक्षित गॅस मिळणार आहे, गॅस टाकी संपल्याची चिंता उरणार नाही, या कामासाठी रवी रजपुते सोशल फौंडेशनच्यावतीने विषेश प्रयत्न करण्यात आले, हा गॅस प्रत्येक्षात दीड महिन्यात ग्राहकांना घरीच मिळणार आहे, या बाबत मा, उपनगराध्यक्ष रवी रजपुते म्हणाले,केंद्रशाश्नांच्या घरोघरी गॅस कनेक्शन देण्याच्या योजना सूविधेअंतर्गत प्रभाग क्र, 12 मध्ये अनेकांनी त्यासाठी मागणी अर्ज केला होता, त्या सर्वांच्या घरी पाइपलाइन बसवण्यात अली आहे, त्यामुळे गॅस टाकीचे ओझे वाहण्याचा त्रास संपणार आहे,त्या गॅस टाकीच्या तुलनेत पूर्ण सुरक्षित व आताच्या टाकीच्या दराच्या 300 ते 350 रुपये स्वस्त मिळणार,आहे सध्याच्या गॅस टाकीच्या तुलनेत पाईपमधील गॅस पूर्ण सुरक्षित व स्वस्त राहणार आहे ,तसेच स्फोट किंवा आग यापासून पूर्णपणे सुरक्षित असणारा पाइप मधील गॅस प्रभाग क्र, 12 सर्व नागरिकांना(ग्राहकांना) घरी येत्या दीड महिन्यात मिळणार आहे,मुख्य पाइपलाइनला घरगुती गॅस पाईप जोडण्याचे काम सुरू असल्याने आता दीड महिन्यात घरी पाईपद्वारे गॅस मिळणार आहे, ही या भागाच्या दृष्टीने गुड न्यूज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Posted inकोल्हापूर
पाईपद्वारे गॅस प्रभाग क्र,12 मध्ये दीड महिन्यात मिळणार!
रवी रजपुते सोशल फौंडेशनच्या प्रयत्नाला यश.
