केंद्र शाळा कबनूर येथे शाळा पूर्वतयारी आणि महिला समुपदेशन मेळावा उत्साहात संपन्न
कबनूर (विशेष प्रतिनिधी चंदुलाल फकीर)आजरोजी केंद्र शाळा कबनूर, कन्या शाळा कबनूर,अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संयुक्त विद्यमाने शाळापूर्व तयारी महिला समुपदेशन मेळावा केंद्र शाळा कबनूर येथे आयोजित करण्यात आला होता.
सकाळी १० वाजता माननीय सरपंच सौ शोभा पोवार यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत सदस्य श्रीमती रजनी गुरव यांच्या उपस्थितीत फीत कापून उद्घाटन करून शाळा पूर्वतयारी, महिला समुपदेशन मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला.
प्रथम गावातून शाळापूर्व तयारी संबंधी दवंडी देत विविध पोस्टर सह दाखलपात्र विद्यार्थ्यांना घेऊन विद्यार्थी, पालक,शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पुष्पवृष्टी करून टाळ्यांच्या गजरात दाखलपात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
विद्यार्थी विकासा संबंधित सामाजिक, भावनिक, गणनपूर्व तयारी आदींचा समावेश असणारी सात वेगवेगळे स्टॉल्स यावेळी मांडण्यात आलेले होते. मेळावा भेट नोंदणी स्टॉलसह शेवटी अभिनंदनाचा स्टॉल मांडलेला होता विविध स्टॉलच्या क्रमबद्ध तपासणीतून विविध कृतींच्या माध्यमातून दाखलपात्र मुला-मुलींची विविध विकास क्षेत्रांमधील प्रगतीचे टप्पे निश्चित करण्यात आले.त्याची नोंद कृती पुस्तकेत घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इयत्ता १ लीत दाखल होण्यास आवश्यक क्षमतांची प्रगती होण्यासाठी सदर मेळावा अत्यंत उपयुक्त होता. माननीय सरपंच शोभा पोवार व ग्रामपंचायत सदस्य रजनीताई गुरव यांच्या उपस्थितीत सर्व दाखलपात्र मुलामुलींची विविध कृतीतून विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री वैभव डावरे सर, स्वागत श्री संजय पवार सर आणि कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सुदाम काशिद सर यांनी केले.
Posted inकोल्हापूर
केंद्र शाळा कबनूर येथे शाळा पूर्वतयारी आणि महिला समुपदेशन मेळावा उत्साहात संपन्न
