केंद्र शाळा गुडाळ शाळा पूर्वतयारी अभियान शाळास्तर मेळावा संपन्न..
गुडाळ /वार्ताहार संभाजी कांबळे
गुडाळ तालुका राधानगरी येथील आज केंद्र शाळा गुडाळ या शाळा अंतर्गत गावामध्ये समाज प्रबोधन जनजागृती व मुलांचे बौद्धिक कौशल्य यांचे मूल्यमापन अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी शाळापूर्व तयारी मुलांचे कौशल्य अभियानांतर्गत इयत्ता 1 लि मध्ये दाखल होणाऱ्या मुलांची व पालकांची गावातून सवाद्य.. मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये लेझीम पथक. ढोल ताशा. पुष्पगुच्छ व मुलांना खाऊ .अशा अनेक माध्यमातून मुलांना गौरवण्यात आले…
त्यानंतर पालकांचे गट पाडून परिपत्रक संदर्भात नुसार सर्व उपक्रम घेण्यात आले. पालकांना पुस्तिका व विकास पत्र यांचे वाटप करण्यात आले. शाळेत मनोरंजनात्मक विविध उपक्रम घेण्यात आले…
सदर कार्यक्रमासाठी सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापक अध्यक्ष व सर्व सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी ,पत्रकार छायाचित्रकार, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका मदतनीस ,लेझीम प्रशिक्षक सुभाष कांबळे, व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते…
फोटो ओळ: माहिती व मार्गदर्शन करताना शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वर्ग पालक विद्यार्थी आधी मान्यवर.