प्रबोधिनीत शनिवारी ‘ बखर शाहूराजाची ‘
इचलकरंजी ता. २८ ,लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतीशताब्दीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय ,कोल्हापूर यांच्यावतीने कृतज्ञतापूर्व वंदन लोकराजाला या उपक्रमाद्वारे शाहू विचारांचा लोकजागर केला जात आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्यय ,कोल्हापूर निर्मित ‘ बखर शाहूराजाची ‘ हा शाहूकालीन आदेश, जाहीरनामे, भाषणे यांच्या संपादित साहित्याच्या अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.हे अभिवाचन डॉ. शरद भुथाडिया,मिलिंद इनामदार,डॉ. रसिया पडळकर,सुहास लकडे,रोहित पोतनीस,हृषीकेश साळवे आदी कलावंत करणार आहेत. हा कार्यक्रम समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने शनिवार ता. ३० एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता समाजवादी प्रबोधिनी सभागृह ,शाहू पुतळ्याजवळ, इचलकरंजी येथे आयोजित केला आहे. राजर्षी शाहू यांची विचारधारा समजून घेणाऱ्या या अभिवाचनाच्या कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील बंधू-भगिनींनी यावे असे आवाहन समाजवादी प्रबोधिनी च्या वतीने करण्यात आले आहे.